महाराष्ट्र
9616
10
अहिल्यानगर जिल्हा परीषदेचा ५९ कोटींचा अर्थसंकल्प सादर
By Admin
अहिल्यानगर जिल्हा परीषदेचा ५९ कोटींचा अर्थसंकल्प सादर
शिक्षण, कृषी आणि आरोग्यावर दिला भर
नगर सिटी न्यूज live24 नेटवर्क
अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे सन
२०२६-२७ या वर्षाचे ५९ कोटी ५३ लाख ३१ हजार ४८१ रुपयांचे मूळ अंदाजपत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी बांनी शुक्रवारी सादर केले. यात शिक्षण, आरोग्य, कृषी व ग्रामीण रस्त्यांसाठी भरीव तरतूद करण्यात आली. यावेळी मुख्य लेखा वित्त अधिकारी शैलेश मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, दादाभाऊ गुंजाळ, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी बाबासाहेव घोरपडे, लेखाधिकारी माणिक नागरे, संदीप बडे, डॉ. बापुसाहेब नागरगोजे, संजय कदम, भास्कर पाटील, दशरथ दिघे, सुधीर शिंदे, सहाय्यक लेखाधिकारी विजय बर्डे, भगवान निकम आदी उपस्थित होते.
अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा ५९ कोटी ५३ लाख ३१ हजार ४८१ रुपयांचे मूळ अंदाजपत्रक जि. प. सीइओ आनंद भंडारी यांनी सादर केले. मागील वर्षीपेक्षा हे अंदाजपत्रक ७ कोटी ४१ हजारांनी जास्त आहे. यामध्ये शिक्षण, कृषी, आरोग्य व रस्ते विकासाला प्राधान्य देण्यात आले. वैयक्तिक लाभाच्या योजनांत शेतकऱ्यांना कडबाकुट्टी पुरविणे (समाज कल्याण विभाग ६० लाख रुपये व कृषी विभाग १८ लाख रुपये) एकूण ७८ लाख (लाभार्थी ३४२) आहे. पाचवी ते दहावीपर्यंतच्या मुलींना मोफत सायकल घेण्यासाठी (समाज कल्याण विभाग ४५ लाख, महिला बालकल्याण विभाग: २० लाख रुपये) एकूण ६५ लाख रुपये (अंदाजे १०००
मागील अर्थसंकल्पापेक्षा ७ कोटींनी अधिक
शिक्षण, कृषी आणि आरोग्यावर दिला भर
लाभार्थी) आहेत. इयत्ता पाचवी ते दहावीत शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकलीसाठी (समाज कल्याण विभाग) ३४.१० लाख (अंदाजे ५२५ लाभार्थी). मागासवर्गीय शेतकऱ्यांना पानबुडी मोटार खरेदीसाठी (समाज कल्याण विभाग) ४२ लाख (अंदाजे ४२० लाभार्थी). मागासवर्गीय व्यक्तींना हॅण्डऑपरेटेड पॉवर विडर खरेदीसाठी (समाज कल्याण विभाग) ६० लाख रुपये (अंदाजे २०० लाभार्थी) तरतूद केली. मागासवर्गीय व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी पिठाची गिरणी घेण्यासाठी (समाज कल्याण विभाग) ५० लाख रुपये (अंदाजे ३७० लाभार्थी) तरतूद आहे. मागासवर्गीय महिलांना लघुउदयोगसाठी पिकोफॉल मशिन खरेदीसाठी
अर्थसहाय्य करणे (समाज कल्याण विभाग) ७० लाख रुपये (अंदाजे ५८३ लाभार्थी. दिव्यांग व्यक्तींना स्वंयरोजगारासाठी अर्थसहाय्य देणे (पिठाची गिरणी) (दिव्यांग कल्याण विभाग) ३०.३० लाख रुपये (अंदाजे २२४ लाभार्थी. दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य (फोटोकॉपी मशिन) (दिव्यांग कल्याण विभाग) ३२ लाख रुपये (अंदाजे ६२ लाभार्थी. दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी शेवई मशिन खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे. (दिव्यांग कल्याण विभाग) २७.४० लाख रुपये (अंदाजे ११० लाभार्थी). ग्रामीण भागातील महिलांना व मुलींना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण देणे (महिला व बालकल्याण विभाग) ४७ लाख (अंदाजे
शैक्षणिक उपक्रमांवरील तरतुदीला प्राधान्य अंदाजपत्रकात जिल्हा परिषद प्राथमिक शाळांत
ओपन स्पेस पार्क/एआय रोबोटीक लॅब विकसित करण्यासाठी ५० लाख रुपये, मिशन स्पार्क अंतर्गत भुंबा केरळ येथे विक्रम साराभाई स्पेस सेंटर, इसरो, आयआयएस, डीआरडीओ अशा संशोधन संस्थांमध्ये गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहली आयोजित करणे ३० लाख रुपये, मिशन आरंभ अंतर्गत इयत्ता तिसरी व सहावीची सराव परीक्षा घेणे तसेच विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप व ऑनलाईन तासिका घेणे २२ लाख रुपये, प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जि. प. शाळेतील चौथी ते सातवी प्रविष्ठ शाळांचे संलग्गता शुल्क व शिष्यवृत्ती परीक्षा फी भरणे, सराव परीक्षा व सराव प्रश्नसंच छापणे १ कोटी रुपये, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माझी आदर्श शाळा विकसित करणे ५ लाख रुपये तरतूद केली आहे.
१३४० लाभार्थी). किशोरवयीन मुलींसाठी जेंडर विषयक आरोग्य व कायदेविषयक प्रशिक्षण देणे. (महिला व बालकल्याण विभाग) १०.५८ लाखांची तरूद असून अंदाजे १६० लाभार्थी आहेत. दिव्यांग महिलांना दिव्यांग बालकांना साहित्य पुरविणे. (महिला व बालकल्याण विभाग) ९.२० लाखखी तरतूद असून अंदाजे ४६ लाभार्थी आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना स्लरी फिल्टर उपकरण अनुदानावर देणे ४० लाख (कृषी विभाग) (अंदाजे २०० लाभार्थी). आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला शेती उपयोगी साहित्यापोटी अनुदान देणे (कृषी विभाग प्रती लाभार्थी ५० हजारांच्या मर्यादेपर्यंत) १० लाख रुपये (अंदाजे २० लाभार्थी). जिल्ह्यातील
ड्रोन फवारणी व एआय अधारित पीक प्रात्यक्षिकांसाठी केली तरतूद
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर एकूलती एक लाडाची लेक या एका मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या जोडप्यास प्रोत्साहन देणे (प्रत्येकी २५००० रुपये) एकूण ५ लाख रुपये, ड्रोन फवारणी यंत्रासठी ४९ लाख रुपये, एआय अधारित ऊस, डाळिंब, केळी इतर पिकांची प्रात्यक्षिके राबविण्यासाठी ९० लाख रुपये, शेतकऱ्यांना स्लरी फिल्टर उपकरण देण्यासाठी ४० लाख रुपये, ग्रामीण रस्त्यासाठी ३.९० कोटी रुपये, जलधारा अंतर्गत जलसंधारण कामाची देखभाल व दुरुस्तीसाठी १ कोटी, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान १ कोटी ८४ लाख आदी तरतुदी करण्यात आल्या आहेत.
पशुपालकांना दूध काढणी यंत्रांचा ६० टक्के अनुदानावर पुरवठा करणे २० लाख रुपये (पशुसवंर्धन विभाग) (अंदाजे १३३ लाभार्थी). जिल्ह्यातील पशुपालकांना पशुधनाकरिता मुक्त संचार गोठा तयार करण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी १५ लाखांची तरतूद असून (पशुसवंर्धन विभाग) (अंदाजे ७५ लाभार्थी). साथीच्या रोगामध्ये / विषबाधेमुळे जनावरे मृत झाल्यास त्यांच्या मालकांना नुकसान भरपाई म्हणून अनुदान मंजूर करणे ३० लाख रुपये (पशुसवंर्धन विभाग) (अंदाजे ३०० लाभार्थी) अशी तरतूद केली आहे. या वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी ६ कोटी ६० लाख ५८ हजारांची तरतूद करण्यात आली असून जिल्ह्यातील ६११० लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे.
Tags :
9616
10




