पाथर्डी तालुक्यातील 'या' गावात निलेश लंके प्रतिष्ठानची कोविड सेंटरला मदत
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 26 एप्रिल 2021
पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र हनुमान टाकळीचे देवस्थान, मिरी, चिचोंडी, आगसखांड येथील कोविड सेंटरला आमदार नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने मोफत आरोग्य साहित्यांचे शनिवारी वितरण करण्यात आले. यावेळी समर्थ हनुमान देवस्थानचे अध्यक्ष रमेशआप्पा महाराज यांनी केले. प्रतिष्ठानचे कार्यवाह अमोल गवळी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष गोकूळ दौंड, पंचायत समिती सदस्य राहुल गवळी, एकनाथ आटकर, मनविसेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण शिरसाठ, ग्रामसेवक सुरेंद्र बर्डे आदी उपस्थित होते. रमेशआप्पा महाराज म्हणाले, सामाजिक भावनेतून आमदार लंके प्रतिष्ठान असे उपक्रम राबवित आहेत. आगामी काळातही मदतीचा उपक्रम राबविला जाईल, असे अमोल गवळी यांनी सांगितले.
यावेळी राजेंद्र भोसले, सतीश मासाळकर, वसंत कुसळकर, आदिनाथ सोलाट, अर्जुन धायतडक, राजूभाई शेख, गणेश वाघ, रघुनाथ वाघ आदी उपस्थित होते.