इगतपुरी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजन संदर्भात आढावा बैठक
इगतपुरी तालुका-
इगतपुरी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संदर्भात (दि.३) बुधवार रोजी सकाळी ११ वाजता तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन संदर्भात आढावा बैठक BRC हॉल इगतपुरी येथे संपन्न झाली.यावेळी साळुंके मॅडम , चिंचोले साहेब व सोनवणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मिटींग घेण्यात आली या बैठकीसाठी तालुका विज्ञान अध्यापक संघाचे पदाधिकारी श्री विलास सोनवणे सर, अध्यक्ष श्री ताराचंद मेतकर सर, उपाध्यक्ष श्री मनोहर कदम सर, कार्यवाह श्री प्रमोद परदेशी सर कोषाध्यक्ष आणि सदस्य श्री इलकसर, श्री विजय सहाणे सर, श्री सिध्दार्थ सपकाळे सर, श्री दत्ता साबळे सर, श्री रोहिदास खैरनार सर, श्री केतन पाटील सर, श्रीमती वर्षा चौधरी मॅडम हे उपस्थित होते. तसेच आयोजक शाळेचे मुख्याध्यापक सोनवणे सर , भांगरे सर उपस्थित होते . याबैठकीत विज्ञान प्रदर्शनासह आयोजना संदर्भात विविध विषयावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले तसेच समित्या स्थापन करण्यात आल्या. तसेच विज्ञान शिक्षकांना विज्ञान लेख जमा करण्याचे आव्हान केले.