महाराष्ट्र
25523
10
एका 'आई'च्या अपेक्षेने एका 'मुलीचा' अंत केला; सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
By Admin
एका 'आई'च्या अपेक्षेने एका 'मुलीचा' अंत केला; सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या!
अहिल्यानगर न्यूज नेटवर्क- पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथील सौ. ऋतुजा अर्जुन खुटवड, वय २५) हिने सासरच्या सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. एका धक्कादायक घटनेने समाजातील विकृत मानसिकतेचा पुन्हा एकदा पर्दाफाश केला आहे. संतती होत नसल्याच्या कारणावरून सासरकडून सातत्याने होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून २५ वर्षीय विवाहितेने २९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास तिने अहिल्यानगर नवनागापूर परिसरात आपल्या राहत्या सासरच्या छळाला कंटाळून सासरच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार २२ मार्च रोजी घडला. याप्रकरणी विवाहितेच्या नातेवाइकांनी दिलेल्या फिर्यादीवरून सासू वसासरा सौ. भारती एकनाथ राजळे व प्रकाश एकनाथ राजळे (दोघे रा.कासार पिंपळगाव) यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.ऋतुजा तुषार राजळे (माहेरचे नाव ऋतुजा अर्जुन खुटवड, वय २५) असे मृत तरुणीचे नाव असून या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. अवघ्या काही महिन्यांपूर्वीच तिच्या आयुष्यात नव्या संसाराची सुरुवात झाली होती. २२ एप्रिल २०२५ रोजी तिचा विवाह तुषार प्रकाश राजळे (रा. तिसगाव, ता. पाथर्डी) याच्याशी झाला होता. मात्र लग्नानंतर काहीच काळात तिच्या आयुष्यातील आनंदाला ग्रहण लागले आणि सासरच्या छळाने तिचं आयुष्य असह्य बनलं.
पप्पा, आता सहन होत नाही; वेदनेचा शेवटचा आक्रोश
आत्महत्येपूर्वी ऋतुजाने लिहिलेली सुसाईड नोट ही केवळ काही ओळींची चिठ्ठी नसून तिच्या मनातील असह्य वेदना, अपमान आणि एकाकीपणाचा जिवंत दस्तऐवज ठरली आहे. मृत्यूपूर्वी काही दिवस आधी ऋतुजाने आपल्या वडिलांना फोन करून सासरच्या त्रासाबद्दल सांगितले होते. त्या संवादात तिच्या आवाजातली असहाय्यता स्पष्ट जाणवत होती.
माझी सहनशक्ती आता संपली आहे अशा शब्दांत तिने आपल्या वेदना व्यक्त केल्या होत्या. ही केवळ तक्रार नव्हती, तर मदतीसाठीचा आर्त प्रयत्न होता. कुटुंबीयांनी तिला धीर देत परिस्थिती सुधारेल अशी आशा व्यक्त केली, मात्र प्रत्यक्षात छळाचा कहर वाढतच गेला. आपल्या माहेरच्यांना त्रास होऊ नये म्हणून ती कदाचित शांत राहिली, पण शेवटी मानसिक ताण इतका वाढला की तिला आयुष्य संपवण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. ही सुसाईड नोट म्हणजे एका मुलीचा शेवटचा आक्रोश असून, समाजाच्या संवेदनशीलतेला हादरवणारा पुरावा आहे.
संततीच्या नावाखाली मानसिक छळ
विवाहानंतर काही काळातच ऋतुजावर मूल होत नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आणि याच कारणावरून तिच्या आयुष्यात मानसिक छळाची मालिका सुरू झाली. तिला वारंवार अपमानास्पद शब्द ऐकावे लागत होते. तू काही कामाची नाहीस, घराला वारस देऊ शकत नाही अशा टोमण्यांनी तिचा आत्मविश्वास खच्ची केला जात होता. घरात तिला दुय्यम वागणूक दिली जात होती. तिच्या भावनांचा विचार केला जात नव्हता, उलट तिच्या अस्तित्वालाच कमी लेखले जात होते. अशा वातावरणात ती पूर्णपणे एकटी पडली होती. हा छळ एकदाच झाला नाही तर दिवसेंदिवस वाढत गेला. मानसिक त्रास, अपमान आणि सततचा दबाव यामुळे तिचं आयुष्य अक्षरशः असह्य बनलं होतं.
सुसाईड नोटमुळे सासरच्यांचा चेहरा उघडा
या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे ऋतुजाने लिहिलेली सुसाईड नोट. या चिठ्ठीत तिने सासरकडून होणाऱ्या छळाचा स्पष्ट उल्लेख केला आहे. यामुळे आत्महत्येमागील कारणांवर कोणतीही शंका उरत नाही. ही नोट म्हणजे तिच्या मृत्यूमागील सत्य बाहेर आणणारा ठोस पुरावा ठरली आहे. सामान्यतः अशा प्रकरणांत छळ सिद्ध करणे कठीण असते, कारण मानसिक त्रासाचे ठोस पुरावे कमी असतात. मात्र या प्रकरणात स्वतः पीडितेनेच सर्व परिस्थिती मांडल्यामुळे सासरच्यांचा खरा चेहरा उघड झाला आहे. या घटनेने समाजात संतापाची लाट निर्माण झाली असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल, तपास वेगात
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला आणि पुढील तपासासाठी शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. सुसाईड नोट, कुटुंबीयांचे जबाब आणि प्राथमिक तपासाच्या आधारे सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून, छळाची तीव्रता, कालावधी आणि इतर संबंधित बाबींची सखोल चौकशी केली जात आहे. तसेच या प्रकरणात इतर कोणाचा सहभाग आहे का याचाही शोध घेतला जात आहे. दोषींना वाचवण्याचा कोणताही प्रयत्न होऊ नये, यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क असल्याचे समजते.
समाजाला सवाल; आई होणं कर्तव्य की जबरदस्ती?
घटना केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित नाही, तर ती संपूर्ण समाजाला आरसा दाखवणारी आहे. आजही अनेक ठिकाणी विवाहानंतर महिलांवर 'आई होण्याचा' दबाव टाकला जातो. स्त्रीची किंमत तिच्या मातृत्वावर मोजली जाते ही अत्यंत चुकीची आणि धोकादायक मानसिकता आहे. स्त्रीच्या आयुष्याचा उद्देश केवळ संततीप्राप्ती नसून तिचं स्वतंत्र अस्तित्व आणि स्वप्नं असतात हे समाज विसरत चालला आहे. अशा घटनांमुळे हा प्रश्न अधिक तीव्रतेने समोर येतो की, स्त्रीला स्वतःच्या आयुष्याबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार आहे का नाही?
छळ म्हणजे खूनच; कायद्याची कठोर अंमलबजावणी गरजेची
मानसिक छळ हा दिसत नाही, पण त्याचे परिणाम अत्यंत घातक असतात. सततचा अपमान, दबाव आणि मानसिक ताण यामुळे व्यक्ती आतून पूर्णपणे कोलमडून जाते. अशा प्रकारे एखाद्याला आत्महत्येस प्रवृत्त करणे म्हणजे अप्रत्यक्षपणे त्याचा जीव घेण्यासारखेच आहे. त्यामुळे अशा प्रकरणांकडे केवळ 'कौटुंबिक वाद' म्हणून पाहणे चुकीचे आहे. कायद्याची कठोर अंमलबजावणी करून दोषींना जलदगतीने शिक्षा देणे आवश्यक आहे जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत.
एका मृत्यूची नाही; विचारसरणीची चौकशी करा
ऋतुजा राजळेचा मृत्यू हा केवळ एका व्यक्तीचा अंत नाही, तर समाजाच्या असंवेदनशीलतेचा परिणाम आहे. जोपर्यंत महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत नाही तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत. संतती ही निवड असू शकते, पण ती सक्ती कधीच नसावी ही जाणीव प्रत्येक घरात पोहोचली तरच ऋतुजासारख्या निष्पाप जीवांचा बळी जाणं थांबेल.असे मत नागरिकांनी व्यक्त केले.
Tags :
25523
10




