महाराष्ट्र
असाम रायफल यांच्या मार्फत मणिपुर येथे आयोजित मेडिकल कॅम्प
By Admin
असाम रायफल यांच्या मार्फत मणिपुर येथे आयोजित मेडिकल कॅम्प साठी मणिपूर राज्यात 4 ठिकाणी रुग्ण तपासणी कॅम्प मध्ये जाऊन सेवा दिली शेवगांव चे सामाजिक कार्यकर्ते डॉ कृष्णा देहाडराय
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
दिनांक 01 डिसेंबर 2024 रविवार या बाबत सविस्तर वृत्त असे की आज दैनंदिन जीवनात प्रत्येकाला स्वतः साठी आणि कुटुंबासाठी द्यायला वेळ नाही अशी अवस्था सर्वत्र असतांना , जीवन अत्यंत व्यस्त झाले असे प्रत्येक जण बोलतो आहे..अश्या प्रचंड धावपळीच्या व्यस्त आयुष्यात देव देश आणि धर्मासाठी निःस्वार्थ धावणारी मानस भेटणं खूप अवघड आहे पण अशी मानस आपल्या सहवासात असतात मात्र त्यांना शोधता आलं पाहिजे.. म्हणून आज मी आवर्जून वेळ काढून माझा बालमित्र, वर्गमित्र डॉ. कृष्णा देहाडराय याचा तो नको म्हणतं असतांनाही त्याच्या हॉस्पिटल मध्ये जाऊन सत्कार केला. डॉ. कृष्णा आणि मी आम्हीं दोघेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात बालपणी पासून एकत्र आलो तें आजपर्यंत जवळपास 35 -36 वर्ष झाली सोबतच आहोत. त्याने डॉक्टरी पेक्षात पदार्पण केल्या नंतर पूर्णवेळ संघ प्रचारक म्हणून त्याने नाशिक जिल्यात आदिवासी भागात काम केले नंतर डॉ. हेडगेवार हॉस्पिटल, संभाजी नगर इथे रुग्ण सेवा केली त्यानंतर पूर्णवेळ प्राचारक म्हणून संघाच्या कामासाठी जाणार अस ही निश्चित केले होते त्या वर तो ठाम होता.पण आई - वडीलांच्या सेवेसाठी निर्णय बदलावा लागला आणि विवाहबद्ध व्हावं लागलं याचा ही मीच साक्षीदार आहे.कृष्णा व सौ. शिल्पा वैहिनी दोघेही डॉक्टर,आई -वडील, मुलं, मेडिकल प्रॅक्टिस सगळं सांभाळून संघ कार्यासाठी सातत्याने अनेकदा बाहेर पडावं लागतं.. त्यात पूर्ण 1 महिना भर नागपूरला जाऊन उन्हाळी शिबिरासाठी दिलेलं योगदान सोबत अहिल्यानगर जिल्हा संघ सहकार्यवाह जबाबदारी असल्यामुळे रोज काहीतरी नियोजन, नित्याची साप्ताहिक मिलन, मासिक वर्ग, दरवर्षी असणारी हिवाळी -उन्हाळी शिबीरं त्याचं नियोजन त्या साठी वेळोवेळी असणाऱ्या बैठका आणि संघकार्य विस्तार हा ध्यास उराशी बाळगून हॉस्पिटल, कौटुंबिक जबाबदारी सगळं सांभाळत त्याची चालणारी महाराष्ट्र भर भ्रमंती हे खरंतर खूप कठीण आहे . डॉ. कृष्णाच्या ह्या सगळ्या कार्याच्या व्यस्तते मध्ये त्याच्या अनुपस्थितीत दवाखाना, कुटुंब ही सर्व जबाबदारी डॉ. शिल्पा वैहिनी सदैब हसतमुखानें सांभाळतात त्याच बरोबर त्यांची ही संघ कार्यात डॉक्टरांना मोलाची साथ आहे हे ही खूप महत्वाचं. अभिमान याचा वाटतो आधीच ह्या सगळ्या जबाबदाऱ्या असतांनाही संघ कार्या व्यतिरिक्त, डॉक्टर म्हणून. इंडियन मेडिकल असोसिएशनचा एक सदस्य# या नात्याने स्वतःचा वेळ आणि वित्त खर्च करून..देश हमे देता है सब कुछ l हम भी तो कुछ देना सिखे ll या संघ गीता प्रमाणे शेवगांव शहरातील डॉ.कृष्णा देहाडराय यांनी 22 तें 27 नोव्हेंबर या दरम्यान असाम रायफल आयोजित मेडिकल कॅम्प साठी मणिपूर राज्यात 4 ठिकाणी रुग्ण तपासणी कॅम्प मध्ये जाऊन सेवा देऊन आला. म्यानमार आणि मणिपूर च्या सेमवरील इंफाळ, लिलॉंग, मोरे अश्या अत्यंत दुर्गम आणि अतिरेकी संवेदनशील भागातील आपल्या देशवासियांना मेडिकल सेवा देऊन कोणताही गाजावाजा न करता आपली सेवा राष्ट्राप्रति समर्पित करून आला. एक मित्र म्हणून माझ्यासाठी ही अत्यंत अभिमास्पद बाब आहे, म्हणून आज त्याची भेट घेऊन त्याचा सन्मान केला व अभिनंदन केले.
अशा माझ्या मित्राला देव,देश, आणि समाज कार्यासाठी उदंड आयुष्य, निरामय स्वास्थ आणि संघ कार्यासाठी शक्ती लाभों हिच प्रभू श्रीरामांचे चरणी माझ्या कुटुंबियांचे वतीने प्रार्थना
मुळ शब्दांकन{ बाळासाहेब उर्फ नानु देशपांडे } रजनी मेडिकल शेवगांव
Tags :
38703
10