स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्तींकडून पाथर्डीतील विविध कोविड सेंटरला मदत
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी शहरातील विविध कोविड केअर सेंटरला स्वयंसेवी संस्था व अनेक दानशूर व्यक्ती मदतीचा हात देण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत.
यामध्ये संजीवनी फाउंडेशन बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्ताने जिल्हाध्यक्ष गोकुळ आंधळे यांच्या पुढाकारातून अतिथी मंगल कार्यालय येथील गोपीनाथ मुंडे कोविड सेंटर व कोरडगाव रोड, विखे बिल्डिंग येथील गोपीनाथ मुंडे साहेब कोविड सेंटरला रुग्णासाठी प्रत्येकी दहा पाण्याचे बॉक्सची मदत देण्यात आली आहे. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमोल गर्जे, संजीवनी फाउंडेशन चे सदस्य बाबासाहेब गर्जे आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ यांच्या वाढदिवसानिमित्त कै. सुमनताई ढाकणे कोविड सेंटरला जिरेसाळ यांनी पाण्याचे बॉक्स व बिस्कीट बॉक्सची भेट देण्यात आली. तसेच मार्केट कमिटीचे संचालक पै. गहिनीनाथ शिरसाट यांचे तर्फे ११ हजारांचा धनादेश कै. सुमनताई ढाकणे कोविड सेंटरला सुपूर्द करण्यात आला. यावेळी योगेश रासने, देवा पवार, राहुल तुपे, विनय बोरुडे,एम.पी. आव्हाड, शिवाजी बडे, अशोक ढाकणे, अनिकेत निनगुणकर ,सोमसेठ जिरेसाळ, संदीप काकडे, गणेश वायकर,इजाज शेख आदींची उपस्थिती होती.
कोविड सेंटरला मदत देण्यासाठी स्त्रिया सुद्धा मागे राहिल्या नाहीत. दुलेचांदगाव च्या माजी सरपंच गीतांजली मंचरे यांचेकडून राजीव राजळे कोविड सेंटरला दहा पाण्याचे बॉक्स व रुग्णांना चिकू फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी आ. मोनिकाताई राजळे यांचे स्वीय सहाय्यक सुरेश बाबर, चंद्रकांत पाचरणे, वनपरिमंडळ अधिकारी बबनराव मंचरे, एकनाथ साठे, शिवाजी दहिफळे आदी उपस्थित होते.