पागोरी पिंपळगाव परीसरातील नागरीकांना सुरक्षित स्थळी हलवून शासनाने तातडीने मदत करावी: शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे खेर्डे, सांगवी बु. व खुर्द, पागोरी पिंपळगांव, प्रभूपिंपरी, सुसरे ही गावे तसेच अनेक वस्त्या नदीकाठी येत असल्यामुळे तसेच पाथर्डी वरुन वाळुंज कडून दोन नद्यांचा संगम पागोरी पिंपळगाव परीसरात येत असल्याने नदीला पहाटेच्या दरम्यान महापुर आल्यामुळे लोकांनी आपल्या वस्त्या सोडून उंच ठिकाणी जाऊन आश्रय घेतला.
जीवीत हानीचा धोका टळला, परंतु अनेकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे अन्यधान्य , खते याचबरोबर घरांचे प्रचंड नुकसान झाले. जनावरे वाहुन गेली, त्यामुळे शासनाने पुढील महापुराचा धोका पाहता तातडीने नदीकाठच्या लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांत्तर करुन निवाऱ्याची सोय करावी. त्यांना शासनाची तातडीची मदत मिळावी,अशी मागणी पागोरी पिंपळगांव येथील रहिवाशी, राष्ट्रीय शेतकरी युनीयनचे जिल्हाध्यक्ष, शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांनी शासनाकडे केली असुन तहसीलदार यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाईचा अहवाल शासनास पाठवून तातडीने मदतकार्य सुरु करावे, अशीही मागणी परीसरातील गावकऱ्यांच्या वतीने शासनास केली आहे.