पक्ष, संघटना बळकटी करिता सर्वांनी जोमाने कामाला लागा : ना.शंकरराव गडाख
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राज्यात शिवसेना पक्ष, संघटना बळकट करण्याकरिता सर्वांनी जोमाने कामाला लागा. राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे असून ते तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन, राज्याचे मृद जलसंधारण कॅबिनेट मंत्री शंकरराव गडाख यांनी केले.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात शिवसंवाद आणि जनसंपर्क साधण्याकरिता घोंगडी बैठक संकल्पना मांडली असता आज दि.१० रोजी कर्जत तालुक्यातील कोंभळी येथे ना.गडाख यांच्या उपस्थितीत घोंगडी बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
या घोंगडी बैठकीत ना.गडाख यांनी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी अनेकांनी आपल्या मागणीची निवेदने दिली.
यावेळी शिवसेनेचे दक्षिण विभाग जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, उत्तर विभाग जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, शिवसेनेचे कर्जत तालुकाप्रमुख बळीराम यादव, युवासेना तालुकाप्रमुख दिपक गांगर्डे, प.स.सदस्य प्रशांत बुद्धीवंत, अमृत लिंगडे, बाळासाहेब निंबोरे, राहुल गांगर्डे, सचिन दरेकर, मारूती उदमले, महेश काळे, हरी बाबर, बबन दळवी, राजेंद्र घोडके, शिवाजी वायसे, मुन्ना शेख, आयुब शेख, अशोक वाघ, वैभव बाबर, गुलाब बाबर, प्रविण तापकीर, शेखर चितळे, नाना बोबडे, सतिष टकले, हरी जगताप, तुषार गांगर्डे, नितीन उदमले, रामा शेलार आदी उपस्थित होते.
ना.गडाख म्हणाले, आपल्या प्रत्येक प्रश्नांकडे मी स्व:ता लक्ष घालून ती प्रश्न मार्गी लावेल. पक्ष संघटना बांधणीकरिता आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत. मात्र विकासकामांच्या बाबत आम्ही तुमच्या पुढे राहू. विकास कामांच्या माध्यमातून शिवसेना पक्ष राज्यात एक नंबरचा पक्ष करायचा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी चिंचोली रमजान येथे ना.गडाख यांच्या हस्ते युवासेना शाखेचे उदघाटन करण्यात आले.