अहमदनगर जिल्ह्यातील सकाळच्या ठळक बातम्या
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहमदनगर शहरात डेंगीसदृश आजाराचे रुग्ण वाढले; विषाणूजन्य आजाराचे रुग्ण वाढल्याने नागरिकांना दक्षता घेण्याचे महापालिकेचे आवाहन
काेराेना संकटाच्या पाठाेपाठ नैसर्गिक संकटे आणि पूरस्थितीमुळे राज्याचे आर्थिक चक्र मंदावले; महसूलमंत्री बाळासाहेब थाेरात यांचे प्रतिपादन
अहमदनगर शहरातील दिल्ली दरवाजा परिसरातील दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरले; कोणतेही व्यवस्थापन न केल्याने महापालिकेचा नागरिकांकडून निषेध
इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याची परवानगी द्या; काेपरगाव तालुका इंग्रजी माध्यम शाळा संघटनेतर्फे गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन
जामखेड येथील आराेळे हाॅस्पिटलमध्ये अद्ययावत कॅथलॅब सुरू; पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार राेहित पवार यांच्या उपस्थितीत उद्घाटन
महावितरणच्या अहमदनगर मंडळाच्या अधीक्षक अभियंतापदी सुनील काकडे यांची नियुक्ती; संताेष सांगळे यांची साेलापूर मंडळ येथे बदली
कडुलिंब वृक्षावर हुमणी भुंगेऱ्यांचा हल्ला; निसर्गप्रेमी तथा जैवविविधता संशाेधन व संवर्धन समूहाच्या पाहणीचा निष्कर्ष
अहमदनगरमधील अमरधाममध्ये मृतावस्थेत आढळलेल्या पक्ष्यांचा मृत्यू उपासमारीमुळे; महापालिकेने झाडे ताेडल्याने हा प्रकार झाल्याचा निसर्गप्रेमींचा दावा
अहमदनगर जिल्ह्यात काल 769 जणांना काेराेना संसर्गाचे निदान; सध्या 5 हजार 918 जणांवर उपचार सुरू
काेराेना उपचारादरम्यान काल 25 रुग्णांच्या मृत्यूची नोंद; जिल्ह्यात आतापर्यंत 6 हजार 414 जणांचा मृत्यू