पोलीस अधिक्षकाचे श्री विशाल गणपतीला साकडे
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
संपूर्ण जग काेराेना मुक्त हाेवाे, अशी प्रार्थना पाेलीस अधीक्षक मनाेज पाटील आणि त्यांच्या पत्नी मिलन यांनी अहमदनगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती यांच्या चरणी केली. श्री गणेश चतुर्थीनिमित्त आज अहमदनगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात 'श्रीं'ची प्राणप्रतिष्ठा पाेलीस अधीक्षक मनाेज पाटील यांच्या हस्ते विधिवत करण्यात आली. या वेळी काेराेना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्यात आले.
'श्रीं'ची प्राणप्रतिष्ठा आज सकाळी साडेनऊ वाजता झाली. विजय क्षीरसागर आणि गणेश भालेराव यांनी पूजेचे पाैराहित्य केले. पूजा झाल्यानंतर पाेलीस अधीक्षक मनाेज पाटील म्हणाले, जग काेराेनामुक्त व्हावे, यासाठी विशाल गपणतीसमाेर प्रार्थना केली. गणेशाेत्सव हा उत्साहाचा आणि आनंदाचा सण आहे. त्याचे पावित्र्य सार्वजनिक ठिकाणी जपले पाहिजे. काेराेनामुळे प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून गणेशाेत्सव साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले. काेराेना काळात रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांना मी वैयक्तिक आणि अहमदनगर जिल्हा पाेलीस दलातर्फे देखील धन्यवाद देताे, असे पाटील म्हणाले.
माळीवाडा देवस्थान पंच ट्रस्टचे अध्यक्ष अभय आगरकर, पंडित खरपुडे, अशाेक कानडे, पांडुरंग नन्नवरे, विजय काेथिंबिरे, हरिश्चंद्र गिरमे, चंद्रकांत फुलारी, रंगनाथ फुलसाैंदर, गजानन ससाणे, बापू एकाडे या विश्वस्तांनी पाेलीस अधीक्षक पाटील यांचा सपत्नीक सत्कार केला. संगमनाथ महाराज, आदित्यनाथ महाराज यांच्यासह सेवेकरी याप्रसंगी उपस्थित हाेते.