या गाईची विक्री झाली १ लाख ६१ हजार रुपयाची ,आश्चर्यचकित झाले सर्व व्यापारी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
१ लाख ६१ हजार रुपये एवढी गायीची विक्री ऐकून चकित झालात ना, पण हे सत्य आहे. कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील रहिवासी अरूण रघुनाथ कदम यांची एचएफ होस्टेन दुसऱ्या विताची पाच वर्ष वयाची गाय १ लाख ६१ हजाराला विकली गेली आहे. राहाता तालुक्यातील निर्मळ पिप्रीं येथील व्यापारी सिंकदर पठाण यांनी रोख रक्कम देत ही गाय खरेदी केली. गाईला चांगली किंमत मिळाल्याने शेतकरी अरुण कदम यांनी गुलालाची उधळण करीत मिरवणूक काढत गायीला रवाना केले. गायीची पाठवणी कतांना मालकाच्या डोळ्यात अश्रु आल्याने गावकरीही भावूक झाले.
कदम यांची गाय एक लाखांपेक्षा जास्त किंमतीला विकली गेल्याची बातमी गावात पसरताच गाय व व्यापारी बघण्यास ग्रामस्थ गोळा झाले. गायीच्या विक्री बद्दल बोलताना कदम यांनी सांगितले की , ‘मागील वितामध्ये सत्ताविस तर या वेळेला तRस लिटरच्या पुढे गाय दूध देईल. गोठ्यात सर्व एच एफ होस्टेन जातीच्या गायी असून खाद्य चारा पोषक घटकांचा समावेश वेळोवेळी खुराका मध्ये केलेला असतो. एक हेक्टर क्षेत्रावर केवळ चारा पिकांची लागवड केलीली असल्याने मेहनतीच्या जोरावर असे भरघोस उत्पन्न मिळत असल्याचे कदम यांनी अभिमानाने सांगितले. कोळपेवाडी येथील मध्यस्थी राजेंद्र महाजन, व्यापारी पठाण व कदम यांचा गावकऱ्यांनी फेटा बांधुन सत्कार केला . वाजत्रींच्या ठेक्यावर गुलाल उधळत गायीची मिरवणूक काढण्यात आली.