अत्याचारांच्या घटनांचा निषेध,
महिलांना सुरक्षा प्रदान करण्याचा घोषणा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असताना कठोर कायदे करुन आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने करण्यात आली. शहरातील मार्केटयार्ड चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मेणबत्त्या प्रज्वलीत करुन महिलांना सुरक्षा प्रदान करण्याच्या घोषणा देण्यात आल्या.
दिल्ली येथे महिला पोलिस कर्मचारीवर झालेला बलात्कार व हत्या, मुंबई येथील साकीनाका येथे युवतीवर झालेला अमानुष अत्याचार, उत्तरप्रदेशमध्ये अलिगड जिल्ह्यातील किसनगड गावातील 8 वर्षीय मुलीवर अत्याचार करुन केलेली हत्या, बुलढाणा नांद्रा कोळी येथील बलात्कार नंतर तरुणीची आत्महत्या, डोंबिवली येथील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार येथे भिल्ल समाजाच्या महिलांना मारहाण अशा प्रकारे महिला, युवती व अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना दिवसंदिवस वाढत आहे. देशात कठोर कायदे नसल्याने आरोपी न घाबरता असे कृत्य करीत आहे. महिलांवर अत्याचार करणार्या आरोपींना कठोर शिक्षा झाली तर इतर महिलांवर अत्याचार करण्याची कोणाची हिम्मत होणार नाही, अशा प्रतिक्रिया यावेळी उमटल्या.
या वेळी आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, महिला तालुकाध्यक्ष कविता नेटके, भारतीय वाल्मिक संघटनेचे तालेवर गोहेर, मंगेश मोकळ, दया गजभिये, महादेव भिंगारदिवे, आशिष भिंगारदिवे, प्रविण वाघमारे, आकाश बडेकर, गौतम कांबळे, नितीन निकाळजे, बापू भोसले, माणस प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विशाल बेलपावर, निखिल सूर्यवंशी, तुषार धावडे, बाळासाहेब नेटके, अरविंद धीवर, बंटी साळवे, आकाश गायकवाड, मयूर भोसले, शाहरुख शेख, विक्रम चव्हाण, शोभा साळुंके, सुरेखा नेटके, नंदा राठोड, शारदा उमाप युवक उपस्थित होते.