पाथडी- ग्रामस्थांचे रस्त्यावर ठिय्या आंदोलन
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्ग कल्याण -निर्मल ( विशाखपट्टणम ) वरील पाथर्डी तालुक्यातील फुंदे टाकळी येथे रस्त्यावर पडलेल्या खड्यामुळे टँकर पलटी झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहनाच्या दुर्तफा रांगा लागल्या होत्या. त्यामुळे ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले.
फुंदे टाकळी येथून जाणारा हा रस्ता अतिशय खराब झाला असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. २४ तासात याच ठिकाणी तीन वाहनाचे रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघात झाले होते. अनेक दिवसांपासून रस्त्याच्या कामाकडे संबंधित ठेकेदार कंपनी लक्ष देत नसल्यामुळे येथील संतप्त ग्रामस्थांनी रास्तारोको करून आंदोलन केले. दरम्यान याच पाथर्डी ते नगर रोडवरील तालुक्यातील माळी बाभूळगाव जवळ आज पहाटेच्या सुमारास टेम्पोचा अपघात झाला. चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने टेम्पो थेट येथील पुलाला धडकून अपघात झाला. यामध्ये टेम्पोचे नुकसान झाले असून चालक देखील जखमी झाला आहे.