पाथर्डी तालुक्यातील 'या' गावातील बंधा-याच्या कामाची चौकशी करा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील मोहोजखुर्द येथील बंधाऱ्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून या कामाची चौकशी करावी, अशी मागणी या बंधाऱ्या शेजारी शेती असलेल्या शेतकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात मोहोजखुर्द येथील शेतकरी अशोक ठोकळ, रमेश पटेकर, सुभाष गायकवाड, अमित ठोकळ, अक्षय ठोकळ, आशा ठोकळ, महेश डोळसे, शामू ठोकळ, संदीप ठोकळ यांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे.