महाराष्ट्र
पन्नास लाखांच्या मोबदल्यात 101 कोटी मिळवा असे आमिष दाखविणारी टोळी अखेर
By Admin
पन्नास लाखांच्या मोबदल्यात 101 कोटी मिळवा असे आमिष दाखविणारी टोळी अखेर
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
50 लाखांचा मोबदल्यात 101 कोटी मिळवा असे आमिष दाखवून व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला!
अँटिक वस्तू विकत घेण्यासाठी 50 लाख रूपये कंपनीमध्ये गुंतवल्यास 101 कोटी रूपये मिळतील, असे आमिष या टोळीने अहमदनगर च्या व्यापाऱ्याला दाखवले या व्यापाऱ्याची फसवणूक करू पाहणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुणे शहरातील विमाननगर परिसरात ही कारवाई केली.
याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच चौघांना अटक करण्यात आली आहे.
अण्णासाहेब रामभाऊ म्हस्के (वय 58 रा. सारसनगर, नगर), धमेंद्र जगदीश पासवान (वय 45 रा. ग्राम बारासोलापुर, बिहार), समीर मन्सूर मुल्ला (वय 39 रा. मिरज जि. सांगली), शेख अकील सुलतान (वय 42 रा. भाळवणी ता. पारनेर) अशी अटक केलेल्यांची नावे असून फिरज शेख (रा. टेंभुर्णी जि. सोलापूर) हा पसार झाला आहे.
नगर शहरातील कापड व्यापारी निखिल लुणे यांना त्यांच्या मित्राने अण्णासाहेब म्हस्के यांची ओळख करून दिली. म्हस्के यांनी फिरज शेख यांच्याकडे अँटिक आर्टिकल वस्तू आहेत, त्या वस्तू विकत घेण्यासाठी 50 लाख रूपये लिओ मेटल टेक्नो प्लॅन बेस्ट कंपनीमध्ये गुंतवणूक केले तर सदरची कंपनी 101 कोटी रूपये देते, असे लुणे यांना सांगितले. त्यानुसार शेख याने व्यापारी श्री लुणे यांना 50 लाख रूपये घेऊन पुणे येथील विमाननगर परिसरातील एका हॉटेलमध्ये बोलविले
. आपली फसवणूक होण्याची श्यक्यता लक्षात आल्याने श्री लुणे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना याबाबत माहिती दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व्यापारी श्री लुणे यांच्यासोबत पुणे येथे गेले. त्यांनी हॉटेलच्या बाहेर सापळा लावला. होता
व्यापारी श्री लुने ठरल्या ठिकानी गेले तेथे गेल्यानंतर शेख नावाचा व्यक्ती आलाच नाही. त्याच्या जागी श्री पासवान नावाचा व्यक्ती तेथे आला. त्याने लुणे यांच्याकडे पैशाची मागणी केली. बाहेर थांबलेल्या पोलिसांना लुणे यांनी इशारा करताच पोलिसांनी म्हस्के व पासवान यांना अटक केली. इतर दोघांना पोलिसांनी नगरमधून अटक केली. आरोपीकडून बँकेचे चेक बुक, मोबाईल, कंपनीचे लेटरहेड, शिक्के असा सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 50 लाखा च्या मोबदल्यात 101 कोटी चे आमिष दाखवून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केल्याने नगरच्या व्यापाऱ्याची 50 लाखाची फसवणूक टळली आहे.
Tags :
466
10