नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधल्याबद्दल व विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी राबविलेले उपक्रम पुराव्यांसह सिध्द केल्याबद्दल संजीवनी अकॅडमीला नॅशनल स्कूल अवार्ड या संस्थेने राष्ट्रीय पातळीवरील ‘एज्युकेशनल एक्सलन्स’ हा पुरस्कार देवुन २०२१ या वर्षातील सर्वोत्तम कामगिरीची दखल घेतली. तर स्कूलच्या संचालिका मनाली अमित कोल्हे यांनी स्कूलच्या स्थापनेपासून शैक्षणिक क्षेत्रात आणलेल्या अमुलाग्र बदलांबाबत व ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढीबाबत च्या प्रयत्नांबद्दल त्यांना ‘एज्युकेशनल रिफॉर्मर ऑफ दि एअर’ पुरस्काराने सन्मानित केले, अशी माहिती स्कूलच्या वतीने देण्यात आली आहे.