पाथर्डी आठवडे बाजाराला परवानगी द्या.
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी येथील बाजार समितीच्या मैदानावर दर बुधवारी भरणाऱ्या जनावरांच्या आठवडे बाजारला परवानगी द्या, या मागणीसाठी आज जनावरांची खरेदी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी पालिकेवर मोर्चा काढला. मोर्चाचे नेतृत्व भाजप कार्यकर्ते अमोल गर्जे यांनी केले. कोरोना साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर पालिकेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी हा बाजार भरवला जाऊ नये, असे आदेश दिले होते. त्यामुळे नाराज झालेले व्यापारी रमाकांत लाहोटी, दशरथ डांगे, भगवान दराडे, अर्जुन केदार, भाऊसाहेब घनवट, दत्तू हाडके यांनी आज गर्जे यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर मोर्चा नेला.