पाथर्डी- एका पतसंस्थेच्या अध्यक्षासह 'या' कारणामुळे तीन जणावर गुन्हा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी: बनावट दस्तऐवज बनवून औद्योगिक संस्थेच्या मालकीच्या भूखंडाची विक्री केल्या प्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष, सचिव व कॅशिअर अशा तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भात खरवंडी कासार येथील भगवानगड परिसर औद्योगिक उत्पादक संस्थेचे संस्थापक चेअरमन लिंबाजी नाना खेडकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, ‘संस्थेच्या नावाने खरवंडी कासार येथे गट नं. ९८/३ बी ही ८७. ५ आर जमीन खरेदी केलेली होती. खरवंडी कासार येथीलच वसंतराव नाईक ग्रामीण पतसंस्थेचा सचिव गणेश बापूराव खेडकर याने पतसंस्थेच्या लेटरपॅडचा गैरवापर करत बनावट दस्तऐवज तयार करत संस्थेचे अध्यक्ष दिनकर नाना खेडकर यांना औद्योगिक संस्थेच्या भूखंडाचे व्यवहार करण्यास अनुमती दिली. १४ ऑगस्ट २०१९ रोजी दिनकर खेडकर यांनी पतसंस्थेचा कॅशिअर राजेंद्र शहादेव दौण्ड याला संस्थेच्या मालकीच्या भूखंडातील प्लॉट साडेतीन लाख रुपयाला विकला, व या व्यवहारातून जमा झालेली रक्कम मात्र औद्योगिक संस्थेच्या खात्यात न भरल्याने लिंबाजी खेडकर यांनी गणेश खेडकर,दिनकर खेडकर व राजेंद्र दौण्ड यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक कौशल्यराम निरंजन वाघ हे करत आहेत.