मोहटादेवी मंदिरात सोने पुरल्याप्रकरणी प्रदीप जाधव आणि संदीप पालवे पोलिसांच्या ताब्यात
नगर- प्रतिनिधी
मोहटादेवी मंदिरात सोने पुरल्याच्या घटनेनं एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी आता पंडित प्रदीप जाधव आणि माजी विश्वस्त संदीप पालवे यांना...
अहमदनगर: मोहटादेवी मंदिरात सोने पुरल्याच्या घटनेनं एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी आता पंडित प्रदीप जाधव आणि माजी विश्वस्त संदीप पालवे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पाथर्डी पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करून ही कारवाई केली आहे.
अंधश्रद्धेच्या नावाखाली मोहटादेवी मंदिरात सुमारे 2 किलो सोने पुरून त्यावर मंत्रोच्चारासाठी 25 लाख रुपये खर्च करण्यात आला होता. आता याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
3 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक माहूरच्या रेणुका मातेचे माहेरघर म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असलेले मोहटा देवी देवस्थान प्रसिद्ध आहे. नगर जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण राज्यातील भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. तर 2010 साली या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला.
यावेळी मंदिर बांधताना मंदिराच्या पायामध्ये अठराशे नव्वद ग्रॅम सोने पुरले. हे सोने पुरताना त्याच्यावर मंत्रोच्चार देखील करण्यात आला होता. या सर्व प्रक्रियेसाठी तब्बल 25 लाख रुपये खर्च करण्यात आला. हे सर्व अंधश्रद्धेमुळे केल्यामुळे तत्कालीन विश्वस्त प्रकाश गरड यांनी आवाज उठवला आणि न्यायालयात याचिका दाखल केली. अंधश्रद्धेच्या नावाखाली मोहटादेवी मंदिरात दोन किलो सोने पुरून त्यावर मंत्रोच्चाराच्या नावाखाली 25 लाख रुपये खर्च केल्याने दोषींवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले.
त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.