पाथर्डी- रस्त्याच्या दुरुस्तीसाठी रास्ता रोकोचा इशारा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील खराब झालेल्या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी. अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा आम आदमी पार्टीचे
जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड यांनी दिला आहे.
दोन वर्षांपासून संपूर्ण पाथर्डी तालुक्यामध्ये खुप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून त्यामुळे तालुक्यातील अनेक ठिकाणी रस्ते हे वाहून गेले आहेत. पाथर्डी मोहोटा, करोडी, चिंचपूर ईजदे, राजुरी या महामार्गावर तर काम चालू असताना निकृष्ट दर्जाचे कामामुळे अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. करोडी येथील नव्याने बांधत असलेला पुलच वाहून गेला आहे. करोडी-टाकळी मानुर या रस्त्यावर तर खुप मोठमोठे खड्डे पडले आहेत. तिसगाव-मिरी, पाथर्डी-जांभळी, खर्डे-पागोरी पिंपळगाव तर, टाकळी मानुर-खरवंडी, माणिकदौंडी परिसर, घाट शिरस परिसर, चिचोंडी परिसर अशा प्रकारे संपूर्ण पाथर्डी तालुक्यामध्ये निकृष्ट दर्जाच्या कामामुळे सर्वच प्रमुख रस्ते हे खड्डेमय झाले आहेत. रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास राज्य महामार्गावर गुरूवारी (ता. ३०) रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.