प्रलोभनाला बळी न पडता सक्षम उमेदवार निवडून द्यावा डॉ. आर. जे. टेमकर
पाथर्डी प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील दादापाटील राजळे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात नुकताच राष्ट्रीय मतदान दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रम प्रसंगी बोलतांना महाविद्यालयाचे प्राचार्य व राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर. जे. टेमकर यांनी भारतासारख्या मोठ्या लोकशाही राष्ट्रांमध्ये मतदारांची भूमिका व मतदान याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सुज्ञ मतदार लोकशाहीच्या जडणघडणी मधला महत्त्वाचा भाग आहे. मतदारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता सक्षम उमेदवार निवडून दिला पाहिजे, असे सांगितले. तसेच त्यांनी उपस्थितांना राष्ट्रीय मतदान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रा. दिलीप चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना भारतीय राज्यघटना व त्या भारतीय राज्यघटनेने भारतीयांना दिलेला मतदानाचा अधिकार याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी निर्भीडपणे मतदान करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विलास बनसोडे यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. आसाराम देसाई यांनी मानले.
या कार्यक्रम प्रसंगी प्रा. एस. एस. गरड, प्रा.अशोक काळे, प्रा. अशोक ताठे, डॉ निर्मला काकडे,डॉ. के. जी. गायकवाड, डॉ. आर. पी. घुले, डॉ. अतुलकुमार चौरपगार, प्रा. रोहित आदलिंग, प्रा. राजेंद्र इंगळे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभाग यांच्यावतीने करण्यात आले.