पाथर्डी- मोबाईल शाॕपी फोडण्याचा प्रयत्न फसला
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी येथील राजश्री मोबाईल शॉपी हे दुकान फोडण्याचा अशस्वी प्रयत्न करणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दुकानातील बसविलेल्या सिक्युरीटी सिस्टममुळे चोरटे दुकानासमोर येताच अलार्म वाजला. संबधितांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता दोन्ही चोरटे जागेवरच मिळाले. यापैकी एक चोरटा पळून जाण्याच्या प्रयत्नात पत्र्यावर पडल्याने जखमी झाला. त्याला नगरला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.