महाराष्ट्र
कळसपिंपरी गावाचा इतर गावांनी आदर्श घ्यावा.- आ. मोनिकाताई राजळे
By Admin
कळसपिंपरी गावाचा इतर गावांनी आदर्श घ्यावा.- आ. मोनिकाताई राजळे
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील कळसपिंपरी येथील सार्वजनिक गणपती महोत्सव, कळसपिंपरी यांनी काल केलेल्या गणपती वित्सर्जन केलेल्या नियोजीत कार्यक्रमाची चर्चा सर्व तालुक्यात पसरली आहे.
कळसपिंपरी गावचे विद्यमान सरपंच दिगू शेठ भवार यांच्या मंडळांनी गणपती बाप्पाची अगदी साजेशे असे नियोजन करून दहा दिवस गावातील विवाहित जोडीच्या शुभ हस्ते बाप्पाची आरती करण्यात आली.आणि दहा दिवस बाप्पासमोर धार्मिक पद्धतीचे म्हणजे कीर्तन, भजन करण्यात आले. काल बाप्पाला निरोप देण्यासाठी अगदी वारकरी संप्रदायला व संतांना पटेल असे पारंपरिक पद्धतीने ढोल -ताशा आणि ह. भ. प लक्ष्मण महाराज भवार यांच्या मार्गदर्शनाने व ह. भ. प. प्रवीण महाराज घायाळ वैष्णव आश्रम कोरडगाव यांच्या आधाराने भव्य दिंडी सोहळा काढण्यात आला होता.
यावेळी मधुर आवाज असणारे गायक मंडळी, मृदूंगाचार्य, टाळ वादक, पेटी वादक गावातील तरुण मित्रांनी जोडीने फुगड्या खेळून गवळणी म्हणत बाप्पा ला निरोप दिला.
यावेळी महिला मंडळ डोक्यावर वृक्ष घेऊन आणि लहान मुली कळस तांब्या घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.
यावेळी तालुक्याचे लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे उपस्थित राहून दिंडी सोहळ्याचा आनंद घेतला.
आणि सरपंच साहेब व गावातील भजनी मंडळ यांचं धार्मिक पद्धतीचे नियोजन पाहून सर्वांचे कौतुक केले.आणि या गावाचा असा आदर्श बाकीच्या गावांनी घ्यावा म्हणजे आपली भारतीय संसुकृती टिकून राहील.असे मत
यावेळी आ.मोनिका राजळे यांनी व्यक्त केले. यावेळी पंचायत समिती सदस्य विष्णुपंत अकोलकर, सुभाष केकाण, सरपंच बिटू नाना देशमुख, नारायण काकडे, बाळू देशमुख तसेच यावेळी गावातील सरपंच दिगंबर भवार, शिवनाथ येढे, आनंद पवार, भानुदास शेळके, बाळासाहेब बाकरे, दादासाहेब झिरपे, योगेश शेळके, बाळासाहेब बुळे, संदीप राठोड, रवी जाधव, बबलू चव्हाण, गणेश मापारी, हिरामन गाडे ,संजय मिसाळ, श्रीकांत मिसाळ, धनंजय गाडे, लखन तरटे, अंकुश मिसाळ, अंकुश तरटे, वैभव भवार, पांडुरंग मिसाळ व तसेच परीसरातील गावचे सरपंच तसेच दिगंबर भवार मित्र मित्र परीवार तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags :
7239
10