मराठा भूषण चंद्रकांत महाराज लबडे यांच्या शिवकार्याचा आदर्श सर्व शिवभक्तांनी घ्यावा.- डॉ.कृषीराज टकले पाटील
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
छत्रपती शिवरायांचा अभिषेक दर शुक्रवारी नवीन सामाजिक राजकीय किंवा शेतकरी वर्गातील शिवभक्ता कडून करण्यात येतो हा अभिनव उपक्रम शेवगाव येथे मराठा भूषण चंद्रकांत महाराज लबडे हे आयोजित करीत असतात छत्रपती शिवरायांचे विचार आणि तत्व जागृत ठेवून तरुणांना प्रेरणा देण्याचे काम या माध्यमातून होत आहे राज्यात कुठेही अशा प्रकारचा उपक्रम केला जात नाही त्यामुळे मराठा भूषण चंद्रकांत महाराज लबडे यांचा आदर्श सर्व शिवभक्तांनी घ्यायला हवा असे मत स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ. कृषीराज टकले यांनी व्यक्त केले
मराठा भूषण चंद्रकांत महाराज लबडे यांनी दर शुक्रवारी शिव अभिषेकाचा उपक्रम हातात घेतल्यामुळे त्यांचा स्वाभिमानी मराठा महासंघाच्या वतीने शेवगाव येथे सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी डॉ. टकले हे बोलत होते याप्रसंगी प्रदेश अध्यक्ष सुभाष गागरे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष अंकुश डांभे, शेवगाव तालुका अध्यक्ष अनिल सुपेकर, नेवासा तालुका अध्यक्ष सुदाम थोरे, आदी उपस्थित होते
स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉक्टर कृषिराज टकले पुढे म्हणाले की चंद्रकांत महाराज लबडे यांनी जो उपक्रम सुरू केला आहे तो शिवभक्तांना प्रेरणा देणार आहे शिवरायांना या माध्यमातून दर शुक्रवारी अभिवादन केले जात असल्यामुळे चंद्रकांत महाराज लबडे यांचे कार्य कौतुकास्पद आहे राजकीय पुढाऱ्यांना शिवरायांच्या आठवण निवडणुका आल्यावर येते मात्र लबडे महाराजांसारख्या शिवभक्तांना दररोज येते हे या उपक्रमातून सिद्ध होत आहे त्यामुळे शिवकार्य त्यांनी अखंड चालू ठेवावे असे आव्हान करण्यात आले.