महाराष्ट्र
व्हिडीओ दाखवाच; राजीनामा देतो ! आमदार लंके यांचे थेट आव्हान
By Admin
व्हिडीओ दाखवाच; राजीनामा देतो ! आमदार लंके यांचे थेट आव्हान
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
उपोषणस्थळी आमचे जेवण करतानाचे फोटो आणि व्हिडिओ तुमच्याकडे आहेत, ते काय खिशात ठेवायला आहेत का? आम्ही खर्या चार-पाच उपोषणकर्त्यांनी त्या ठिकाणी काही खातांनी कुठे फोटो आला, तर हा नीलेश लंके त्याच क्षणी विधानसभेचा राजीनामा देईल, असे थेट आव्हान आमदार नीलेश लंके यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांचे नाव न घेता दिले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी खा.विखे यांनी उपोषण स्थळी खातानाचे व्हिडिओ, फोटो आपल्याकडे असल्याचं जाहीर सभेत सांगितले होते.
जुन्या खेर्डे रस्त्याला तत्काळ निधी उपलब्ध करुन द्यावा व रस्त्याचे काम सुरू करावे.
गेल्या अनेक दिवसांपासून जुन्या खेर्डे रस्त्याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्याकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्याचाच निषेध म्हणून बुधवारी सकाळपासुन सामजिक कार्यकर्ते सोमनाथ बोरुडे, राष्ट्रवादीचे राजेंद्र बोरुडे यांनी उपोषण केले. या उपोषण स्थळी आमदार लंके यांनी भेट देऊन उपोषणकर्ते व पालिका प्रशासन यांच्यात मध्यस्थी करून उपोषण सोडले. त्यावेळी आमदार लंके प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, बंडू पाटील बोरुडे, राजेंद्र दौंड, गहिनीनाथ शिरसाट, पांडुरंग शिरसाट, चंद्रकांत भापकर, रफिक शेख, देवा पवार, आतिश निर्हाळी, सिताराम बोरुडे, विकास आघाव, शिवाजी साखरे, बबलू वावरे आदी उपस्थित होते.
आ. लंके म्हणाले, कल्याण विशाखापट्टणम महामार्गाचे गेल्या सात वषार्ंपासून रखडलेले काम तातडीने सुरू करावे, या मागणीसाठी आपण गेल्या महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चार दिवस आमरण उपोषण केले. मात्र उपोषण काळात आपण अन्न व फळांचे सेवन केले असून आपल्याकडे त्यांचे फोटो व व्हिडिओ आहेत, असे विरोधकांचे म्हणणे आहे. जर त्यांच्याकडे असे फोटो, व्हिडिओ असतील तर घरात ठेवण्यापेक्षा सार्वजनिक करावे. ते फोटो व्हिडीओ खरे निघाले, तर मी आमदार पदाचा राजीनामा देईल. तुमच्याकडे ढोंगबाजी आहे, आमच्याकडे नाही, लोकांना दाखवण्यासाठी रोडच्या कडेला बसून जेवणावळी घेतात, आम्ही अशी ढोंगबाजी करत नाही. असा टोलाही लंके यांनी विखे यांना लगावला आहे.
Tags :
973085
10