आदिवासी भागातील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता!
शिक्षण समितीच्या प्रयत्नांना अखेर यश
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
आदिवासी भागात शासकीय सेवा बजावणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांना १,५०० रुपये प्रोत्साहन भत्ता लवकरच मिळणार आहे. याबाबत ग्रामविकास विभागाने १७ जून २०२० च्या पत्रानुसार आदिवासी भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कमाल प्रोत्साहन भत्ता १,५०० देण्याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीने ६ एप्रिल २०२३ रोजी नाशिक विभागीय आयुक्तांना निवेदन दिले होते.
दरम्यान, या पत्रासोबत अमरावती विभागीय आयुक्तांचे पत्रही जोडले होते. शिक्षक समितीने वारंवार जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला होता. १६ नोव्हेंबर २०२३ रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना स्मरणपत्रही दिले होते. याविषयी जि.प. प्राथमिक शिक्षण विभागाने त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, नाशिक, कळवण, इगतपुरी,
आदिवासी भागात सेवा पुरविताना कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शिवाय पदर मोड करून कामे करावी लागतात. अशा परिस्थितीत होणारी अडचण दूर व्हावी यासाठी शासनाकडून मिळणारा प्रोत्साहन भत्ता निश्चितच फायदेशीर ठरणार आहे.
दिंडोरी या आदिवासी तालुक्यातील कर्मचाऱ्यांना १,५०० रुपये भत्ता देण्याची कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी शिक्षक समितीचे आभार मानले.
यासाठी तत्कालीन महाराष्ट्र शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष आनंदा कांदळकर, सचिव प्रकाश सोनवणे, त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष गणेश बर्के, तालुका सचिव अमृत जगदाळे, एल.के. अहिरे, योगेश भामरे, संजीव भामरे, शिवाजी सोनगिरे, केशव अहिरे यांनी पाठपुरावा केला होता.