महाराष्ट्र
कासार पिंपळगाव सब स्टेशन वरील भारनियमन बंद करावे.
By Admin
कासार पिंपळगाव सब स्टेशन वरील भारनियमन बंद करावे.- आ. निलेश लंके
पाथर्डी- प्रतिनिधी
गेल्या सहा महिन्यापासून पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव सब स्टेशन वरील कासार पिंपळगाव, पाडळी, चितळी, ढवळेवाडी, हनुमानटाकळी कोपरे या भागातील गावठाण लाईटवर सकाळी चार ते आठ या काळात भारनियमन केले जाते वीज वितरण चे अधिकारी सांगतात. या भागात वसुली कमी असल्यामुळे भारनियमन केले जात आहे गेले परंतु सहा महिन्यात वसुलीचे प्रमाण वाढून वीज गळती सुद्धा कमी झाली आहे तसेच नवीन वीज जोडणीचे कामे देखील वाढले आहे.
आत्ता जानेवारी ते मार्च वेगवेगळ्या परीक्षांचा सीजन चालू आहे त्यामध्ये दहावी बारावीसह इतर परीक्षा होणार आहेत
अशावेळी विद्यार्थ्यांना पहाटे अभ्यास करण्यास अडचण होत आहे,वृद्धेश्वर कारखान्याच्या ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाड्या,तसेच पहाटे डयुटीला जाणारे,मॉर्निंग वॉक करणारे या सर्वांच्या अडचणी लक्षात घेऊन राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी आमदार निलेश लंके यांच्याकडे भारनियमन बंद होण्यासाठी निवेदन दिले होते.
आमदार निलेश लंके यांनी तात्काळ वीज वितरणाच्या आधीक्षक अभियंता श्री काकडे यांना संपर्क साधून भारनियमन बंद करावे ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर होतील यासाठी सूचना केली आहे.तसेच कासार पिंपळगाव सब स्टेशन वरून हनुमान टाकळी शेती फिडर साठी नवीन लिंकलाईन टाकण्यासाठी स्वतंत्र लाईन टाकून विशेषता डिसेंबर ते मे या कालावधीमध्ये वीज पंपाला जी जास्त लाईट लागते त्याचा लोड कमी होईल परिणामी सब स्टेशन वरील लाईट ट्रीप होण्याचे प्रमाण कमी होईल यासाठी प्रस्ताव तयार करण्याची सूचना देखील त्यांनी दिली.तसेच याच सबस्टेशन वरून गावठाण साठी पाडळी आणि कासारपिंपळगाव असे दोन फिडर जातात पण सुरुवातीला 5 पोल पर्यंत एकाच लाईन वरून सप्लाय होतो त्यामुळे ट्रीपिंग चे प्रमाण जास्त आहे.ते देखील स्वतंत्र वेगळे करावे अशी सूचना आ. लंके केली आहे.
Tags :
469216
10