शेवगाव शहर कडकडीत बंद; आरक्षणावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा आमरण उपोषणाला बसणार - चंद्रकांत लबडे महाराज
शेवगाव- प्रतिनिधी
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शांततेत चाललेल्या उपोषणकर्त्यावर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्ज बद्दल शेवगाव मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बंद पुकारण्यात आला या बंदला शेवगाव शहरासह तालुक्यातील लहान मोठ्या स्वरूपाचे व्यवहार बंद ठेवून शेवगाव बंदला पाठिंबा दर्शवण्यात आला तसेच तालुक्यातील गावागावातील नागरिकांनी आपापले दुकाने बंद ठेवून पाठिंबा दर्शविला यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्य सरकारचा निषेध व्यक्त करून राज्य सरकार विरोधात निदर्शनं करण्यात आले. सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सर्वांनी एकत्र येत शेवगाव शहरातील मुख्य रस्त्यावर फेरी काढली व सरकार विरोधात निदर्शने व्यक्त केली
चौकट - शेवगाव तालुका कडकडीत बंदला व्यापाऱ्याने प्रतिसाद देत बंद ठेवले तसेच ग्रामीण भागात देखील व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा दिला. लवकरात लवकर सरकारने निर्णय नाही घेतला तर खरडगाव ता शेवगाव येथे मी माझे सहकारी आमरण उपोषणाला बसणार आहे.