महाराष्ट्र
18897
10
शिक्षकाच्या विविध प्रश्नासंबधी उप सचिव व शिक्षण संचालक यांची घेतली भेट
By Admin
शिक्षकाच्या विविध प्रश्नासंबधी उप सचिव व शिक्षण संचालक यांची घेतली भेट
20%,40,60% शिक्षकांच्या विविध प्रश्नावर चर्चा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
विनाअनुदानित, अंशतः अनुदानित 20%,40,60% वाल्या शिक्षकांसाठी तसेच शिक्षकांच्या प्रश्नांची साठी आज सकाळी मुंबई मंत्रालय येथे उप सचिव महाजन साहेब यांची तर दुपारी पुण्यात संचालक मा शरद गोसावी सो व मा के पी पाटील साहेब यांची साहेब यांची भेट
महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष तथा शिवसेना उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख शुभांगी ताई पाटील यांनी विनाअनुदानित, अंशतः अनुदानित 20%,40,60% वाल्या शिक्षकांसाठी तसेच शिक्षकांच्या प्रश्नांची साठी आज सकाळी मुंबई मंत्रालय येथे उप सचिव महाजन साहेब यांची तर दुपारी पुण्यात संचालक मा शरद गोसावी सो व मा के पी पाटील साहेब यांची साहेब यांची भेट घेत समस्या सोडवल्या.
राज्यातील विनाअनुदानित, अंशतः अनुदानित , शाळांना देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या शासन निर्णयाबाबत शिक्षकांना प्रत्यक्ष अनुदान मिळण्यासाठी येणाऱ्या अनंतअडचणी सोडवण्यासाठी आज राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांनी पुणे येथे न जाता सर्वप्रथम मुंबई मंत्रालय येथे जाऊन उप सचिव शालेय शिक्षण विभाग मा महाजन साहेब यांची सर्वप्रथम भेट घेतली, याचे कारण म्हणजे प्रत्येक वेळी शिक्षकांच्या समस्या मांडताना संचालक कार्यालयातून वरिष्ठांचे आदेश मिळाल्यावर आम्ही प्रश्न सोडवू! आम्हाला मंत्रालयाचे आदेश हवे ,इत्यादी अडचणी सांगितल्या जातात त्यामुळे शुभांगी ताईंनी सर्वप्रथम मंत्रालयाच्या सचिवांची व उपसचिवांची भेट घेत अनुदान वितरणासाठी येणाऱ्या अडचणी व शुल्लक शुल्लक कारणांवरून सुमारे 70 ते 80 टक्के शाळा अपात्र होणार असल्याने या अटी शिथिल करण्यासाठी मा सचिवांना संपूर्ण प्रश्न व त्याचे गांभीर्य समजावून सांगितले, त्या मध्ये प्रामुख्याने अद्यापही अनेक जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी यांनी सन 20-21, 21-22, च्या संचमान्यता दिलेल्या नाहीत त्यामुळे शाळा अपात्र होणार आहेत, तसेच पटसंख्या बाबतीतही व्हॅलीड-इन व्हॅलीड बाबत जो घोळ सुरू आहे तो आपल्या स्तरावरून दूर करण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती केली.
त्यानंतर दुपारी शुभांगी ताई चार वाजता पुणे संचालक कार्यालय येथे गेल्या व त्या ठिकाणी राज्याचे शिक्षण संचालक माननीय गोसावी साहेब यांची भेट घेऊन विनाअनुदानित 20% ,40% ,६० टक्के यांच्या सर्व अडचणी सांगितल्या.
त्याचबरोबर संच मान्यते अभावी शाळा अपात्र झालेल्या आहेत. त्याचा देखील मुद्दा उपस्थित केला त्यानुसार माननीय शिक्षण संचालक यांनी 2021 -22, 22- 23 च्या संच मान्यतेच्या बाबतीत सन 2018 19 मध्ये कोविड काळात ज्या संच मान्यता देण्यात आल्या होत्या त्याच धर्तीवर 2021- 22 च्या दिवशी संच मान्यता तात्काळ देण्याचे निर्देश दिले व त्याबाबत शिक्षकांना आपल्या शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले.
त्याचबरोबर पटसंख्याबाबत नव्याने 20 टक्के अनुदान येण्यासाठी जी 30 नोव्हेंबर ची अट घालण्यात आलेली होती ती शिथिल करून ती 1 एप्रिल पर्यंत वाढवण्यात यावी अशी आग्रही भूमिका शुभांगी ताई यांनी घेतली. ज्यामुळे अनेक शाळांचे पटसंख्या अभावी होणारे नुकसान थांबणार आहे व तिच्यावर पट ज्यावेळी असेल ती पटसंख्या ग्राह्य धरण्याबाबत आग्रही भूमिका मांडली. त्याचप्रमाणे टी ई टी संदर्भात शिक्षकांना येणाऱ्या अडचणी दूर करून टी ई टी मुळे ज्यांचे शालार्थ आयडी थांबवण्यात आलेले आहेत त्यांचे देखील शालार्थ आयडी तात्काळ देण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे अपंग समावेशित शिक्षकांबद्दल शिक्षकांचे वेतन थांबवण्यात आलेले आहे त्यांचे वेतन सुरू करण्याबाबत व पदस्थापने बाबत आग्रही भूमिका मांडली त्यावर माननीय शिक्षण संचालक यांनी असे सांगितले की सदरचा मुद्दा न्यायप्रविष्ठ असून लवकरच त्याच्यावर मा. न्यायालयाचा निकाल येणार आहे व त्याबाबतीत आमच्या बाजूने सकारात्मक बाजू मांडण्यात आलेली आहे व त्यामुळे निकालानंतर शिक्षकांच्या हिताचा निर्णय होईल अशी ग्वाही दिली.
त्याच बरोबर नियमित शिक्षकां च्या वेतन बी डी एस बाबतीत येणाऱ्या अडचणी व इतर समस्या सोडवण्याची देखिल मागणी या वेळी दोन्ही शिक्षण संचालक मा गोसावी साहेब व मा के पी पाटील साहेब यांच्या कडे राज्याध्यक्ष शुभांगी ताईंनी केली,
या प्रसंगी शुभांगी ताई यांच्या सह महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष श्री गोपाल गोरे सर व संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते
Tags :
18897
10





