महाराष्ट्र
7771
10
चौंडी येथे होणाऱ्या अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवाला
By Admin
चौंडी येथे होणाऱ्या अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवाला लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा- नानाभाऊ पडळकर
पाथर्डी प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या जामखेड तालुक्यातील चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या होणाऱ्या जयंती उत्सव सोहळ्यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन जय मल्हार युवा प्रतिष्ठानचे संस्थापक तथा अध्यक्ष नानाभाऊ पडळकर यांनी केले आहे.
सबंध देशभरातील ज्योतिर्लिंगाचे जीर्णोद्धार करणाऱ्या इंग्रजांना सळो की पळो करणाऱ्या, प्रस्थापित राज्य स्वतःच्या ताब्यात घेणाऱ्या इंदोरच्या महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ जयंती निमित्ताने नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या गावी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाला त्यांच्या जन्म गावी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती उत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात मध्ये संपन्न होणार आहे. या सोहळ्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार राम शिंदे, राज्यातील विविध आमदार, मंत्री उपस्थित राहणार आहेत.
या जयंती उत्सव सोहळ्यांच्या माध्यमातून धनगर बहुजन समाजाला ऊर्जा मिळावी, त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचारांची देवाणघेवाण, गावकुसातल्या गावगाड्यांमध्ये वाड्यावर सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचावी हा उद्देश मनाशी ठेवून दरवर्षी हा जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. या सोहळ्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक आंध्रप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश यासह दिल्ली या राज्यातून धनगर समाज खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतो व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य या पृथ्वीतलावर ना भूतो ना भविष्य असे आहे, त्यामुळे त्यांच्या विचारांचा, त्यांच्या इतिहासांचा गाजावाजा व्हावा, इतिहास घराघरांमध्ये पोहोचवा हा उद्देश मनाशी बाळगून या ठिकाणी हा जयंती उत्सव सोहळा दरवर्षी साजरा केला जातो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देशभरातील बारा ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार, त्याचबरोबर मुस्लिम समाजाच्या मशिदीला निधी देत मशिदीचे बांधकाम केलेले आहे. समविचारी व इतिहासाचा खूप मोठा पगडा असणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार तळागाळातील गावगाड्यांमध्ये गावकोसात, वाड्यावर पोहोचण्याचा मार्ग जन्मस्थळ आहे. या जयंती उत्सव सोहळ्यासाठी लाखो धनगर समाज बांधव उपस्थित राहून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करतात. त्यामुळे नगर जिल्ह्यासह मराठवाड्यातील धनगर समाज बहुजन बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जय मल्हार युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नानाभाऊ पडळकर यांनी करून दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास खूप मोठा असून त्यांचा इतिहास आणि काही घरांमध्ये पोहोचलेला नाही. त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ चौंडी येथे आपण सर्वांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहुन आपल्या विचारांची देवाणघेवाण गावकुसातल्या व गाव गाड्यातील सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी हा जन्मोत्सव सोहळा दरवर्षी साजरा केला जातो. या माध्यमातून सबंध राज्यभरातील देशभरातील धनगर समाज एक संघ व्हावा, संघटनात्मक बांधणी व्हावी हा उद्देश आहे. या जयंती उत्सवाचा मेळाव्याचा असून त्यामुळे सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी मोठ्या ताकतीने उपस्थित राहुन आपलं शक्ती प्रदर्शन त्याचबरोबर धनगर समाजाची एसटी अनुसूचित जमातीच्या आरक्षणासंदर्भामध्ये या ठिकाणी चर्चा होऊन विचारांची देवाणघेवाण होणार आहे, त्यामुळे आपण सर्वांनी या सोहळ्याला लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन नानाभाऊ पडळकर यांनी केले आहे.
Tags :
7771
10





