महाराष्ट्र
11280
10
श्री समर्थ हनुमान मंदिराचा कलशारोहण व धर्मध्वज स्थापना कार्यक्रम संपन्न
By Admin
श्री समर्थ हनुमान मंदिराचा
कलशारोहण व धर्मध्वज स्थापना कार्यक्रम संपन्न
मंदिर बांधण्याचे काम पुर्ण झाल्याने माझे आयुष्य आज ख-या अर्थाने परीपुर्ण झाले.-प.पू. रमेश आप्पा महाराज
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी येथे श्री समर्थ हनुमान मंदिराचा
कलशारोहण व धर्मध्वज स्थापना कार्यक्रम( दि.२१) रविवारी हनुमान देवस्थान समिती अध्यक्ष परम पुज्य रमेश आप्पा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
यावेळी हनुमान मंदिर परीसरात सकाळी पुजा पाठ तसेच हनुमान जप झाला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा शेवगाव-पाथर्डी तालुक्याच्या आ.मोनिकाताई राजळे, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले,
मा.आ.बाळासाहेब मुरकुटे,ह,भ.प.राम महाराज झिजुर्कै,गणपती आव्हाणे देवस्थान समिती अध्यक्ष मालोजीराव भुसारी,कानिफनाथ देवस्थान समिती अध्यक्ष राधाकिसन मरकड, रेणुका माता देवस्थान अमरापूर अध्यक्ष व रेणुका माता मल्टीस्टेट चेअरमन प्रशांत भालेराव,पाथर्डी बाजार समितीचे चेअरमन सुभाष बर्डै , संचालक वैभव खलाटे,एकनाथ आटकर ,अनासपुरे सर, दिनकर महाराज, उद्योजक आण्णा दगडखैर तसेच इतर सर्व पदाधिकारी महिला पुरुष गावातील परीसरातील ग्रामस्थ व पुणे,औरंगाबाद,सोलापूर,बीड येथून आले भक्तजण यावेळी उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
हे भव्य दिव्य मंदिर ११ कोटी रुपयांचे असून भव्य दिव्य असे देशातील मोठे मंदिर आहे.
श्री क्षेत्र हनुमान टाकळी, ता.पाथर्डी येथे श्री समर्थ हनुमान मंदिराचा कलशारोहण व धर्मध्वज स्थापना परम पूज्य माधव स्वामी यांच्या आशीर्वादाने, साधू संतांच्या व भाविकांच्या उपस्थित गुरुवर्य प.पु. रमेश आप्पा महाराज यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.
मंदिर बांधण्याचे काम पुर्ण झाल्याने माझे आयुष्य आज ख-या अर्थाने परीपुर्ण झाले आहे.बाबा महाराज आर्वीकर शेवटी आजारी असताना त्यांनी इच्छा माधव बाबा यांना मंदिराचे काम पुर्ण करायला सांगितले होते. त्यावेळी बाबांनी मंदिराचे काम पुर्ण करणार असे सांगितले होते.
ते आज पूर्ण झाले आहे. नगर जिल्ह्यातील हनुमानाचे मंदिर महत्त्वाचे स्थान आहे. समर्थ रामदास स्वामीनी संकल्पनेतून साकारलेले हनुमान मंदीर आहे.
गुरुनिष्ठा कशी शिकावी.गुरुविषयी आदर कसा असावा.हे बाबामहाराज आर्वीकर, माधव स्वामी यांच्या सहवासात पाहायला मिळाली.
सदगुरुची कृपा ही महत्त्वाची आहे.
आजचा दिवस आपल्या गावासाठी महत्त्वाचा आहे.आपले सर्वाचे जीवन आनंदाचे जावो.असे प.पू.रमेश आप्पा महाराज यांनी सांगितले.
हनुमंत देवाची सेवा केली तर आपल्याला शक्ती,आपली इच्छा,संकल्प पुर्ण होतात.
गावातील महीला तसेच गावाबाहेरील महिलांनी मंदिरासाठी देणगी याठिकाणी दिलेली आहे.सर्वानी देणगी देऊन हातभार लावल्याने मंदिराचे काम पुर्ण झालेले आहे.यासाठी आपणा सर्वानी प.पूज्य रमेश आप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचे काम पुर्ण केले आहे.भव्य दिव्य सोहळा संपन्न झाला आहे.
तालुक्यातील तिर्थ क्षेत्र विकासासाठी प्रयत्नशील असून विकास योजना देवस्थानसाठी शासनाकडून मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. आपल्याला या देवस्थान चे आणखी खूप मोठे काम करायचे आहे. मंदिर परीसरात काम आणखी काम करायचे आहे.
तिर्थक्षेञ विकास करण्यासाठी शासनाकडे मागणी करणार आहे.
खासदार निधी व जिल्हा परीषद अंतर्गत तीस लाखाचा निधी देवस्थानला प्राप्त झालेला आहे.या बरोबरच गावातील माहेरवाशींनी महीलांनी देणगी स्वरुपात दिलेले योगदान खूप अनमोल आहे.असे यावेळी आ.मोनिका राजळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
यावेळी महा प्रसादासाने कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी महंत ह.भ.प. विठ्ठल महाराज (गहिनीनाथ गड), ह.भ.प.राम महाराज झिंजूर्के (सद्गुरू श्री.जोग महाराज सेवा संस्थान, आखेगाव), मा. सुनिल गोसावी (जिल्हा सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष मोहटादेवी संस्थान), मा. दादासाहेब चितळे (अध्यक्ष मायंबा देवस्थान), मा. गणेश पालवे (अध्यक्ष वृद्धेश्वर देवस्थान), मा. राधाकिसन मरकड (अध्यक्ष कानिफनाथ देवस्थान मढी), मा. मालोजीराव भुसारी (अध्यक्ष गणपतीश देवस्थान, आव्हाणे), मा. शिवाजीराव कर्डिले साहेब (अध्यक्ष, जिल्हा सहकारी बँक), मा.आ.बाळासाहेब मुरकुटे, मा. प्रशांतजी भालेराव (चेअरमन रेणुकामाता मल्टीस्टेट), श्री. राजीव सोमपुरा, (मंदिर कॉन्ट्रक्टर) तसेच सर्व आजी माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती, खरेदी विक्री संघ, बाजार समिती पदाधिकारी, तालुक्यातील भाविक भक्त, परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags :
11280
10





