100 जलस्त्रोत गाळमुक्त करणार-जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले
By Admin
100 जलस्त्रोत गाळमुक्त करणार-जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले
नगर सिटीझन live टिम-
नगर जिल्ह्यातील 100 जलस्त्रोतांमधील गाळ काढून त्यांना गाळमुक्त धरण करण्याचे नियोजन असून त्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले हे नेवासा तालुक्यातील भेंडा येथील शासकीय कोविड सेंटरची पहाणी करण्यासाठी आले असता जिल्हास्तरीय जलसाक्षरता समितीचे जलप्रेमी सुखदेव फुलारी यांनी राज्यात व जिल्ह्यात सुरू असलेल्या जलजागृती अभियानाच्या अनुषंगाने संवाद साधला.16 ते 22 मार्च या कालावधीत जल साक्षरता केंद्र,यशदा व भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा,अहमदनगर कार्यालय यांचे मार्फतराबविलेल्या जलजागृती कार्यक्रमांची माहिती दिली.
यावेळी जिल्ह्यातील जलसाक्षरता चळवळ आणि शासकिय इमारती वरील रेनवॉटर हार्वेस्टिंगकडे होत असलेले दुर्लक्ष बाबद होत आहे याकडे जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधले असता डॉ.भोसले म्हणाले, जलयुक्त शिवार,पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून या जिल्ह्यात यापूर्वी लोकसहभागातून कामे झालेली आहेत. आज ही उपमुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली जलसंधारणावर बैठक झाली.
त्यात भारतीय जैन संघटनेने पुढाकार घेतलेला आहे.जिल्ह्यात जवळ पास 100 जलस्त्रोतांमधील गाळ काढून त्यांना गाळमुक्त धरण करण्याचे नियोजन असून त्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.पाण्याचे महत्व कोणाला नव्याने सांगण्याची गरज नाही.पाणी हे आपले भविष्य आहे.त्याला वाचविणे,त्याचे संरक्षण-संवर्धन करणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे.
शासकिय व खाजगी इमारती वरील रेनवॉटर हार्वेस्टिंग बाबद बोलतां डॉ.भोसले म्हणाले,माझी वसुंधरा हा नवीन कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे.नवीन बांधकाम होणाऱ्या घरांसाठी-इमारतींसाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग करणे सक्तीचे आहे.जुन्या इमारतींवर जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे नावीन्यपूर्ण योजनेतून रेनवॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा कशी कार्यान्वयीत करता येईल याकडे ही लक्ष दिले जाईल.