महाराष्ट्र
37854
10
आंतरजिल्हा बदली शिक्षकांना एक आगावू वेतनवाढ मिळावी-
By Admin
आंतरजिल्हा बदली शिक्षकांना एक आगावू वेतनवाढ मिळावी- प्रहार शिक्षक संघटना
अहमदनगर येथील मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याकडे मागणी
अहमदनगर प्रतिनिधी:
अहमदनगर प्रहार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांनी अहमदनगर जिल्ह्यामध्ये आंतरजिल्हा बदलीने हजर झालेल्या शिक्षकांना एक आगावू वेतन वाढ देण्यात यावी ,अश्या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले आहे.
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची आंतरजिल्हा बदली झाल्यानंतर शासन पत्र दिनांक ३१ जुलै १९७७ नुसार बदली करून दुसऱ्या जिल्हा परिषदेत गेल्यानंतर सेवा जेष्ठता शून्य होते, ही बाब शासनाने विचारात घेऊन त्याबाबत न्याय देण्याच्या दृष्टीने शासन आदेश ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्र. लो.आ. प्र. २०२ /प्र २००२ प्र. क्र/आस्था-५ दिनांक ३/१०/२००३ नुसार पात्र कर्मचाऱ्यांना एक आगाऊ वेतन वाढ देण्याचे आदेश ग्राम विकास विभाग यांनी निर्गमित केलेले आहेत.
तसेच ग्रामविकास विभाग यांच्याकडे माहिती अधिकार अंतर्गत माहिती मागवली असता त्याबाबत अभिप्राय देतांना आजही हा शासन निर्णय लागू असल्याबाबतचे संबंधितास माअअ -२०२३/प्र.क्र.३५३/आस्था -४ दि.५/९/२०२३ या पत्रकान्वये कळविले आहे.याच शासन आदेशची अंमलबजावणी अहमदनगर जिल्ह्यात करावी, या मागणी अनुषंगाने प्रहार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना अहमदनगर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे निवेदन देवून करण्यात आली आहे.
अहमदनगर जिल्ह्यामध्ये आंतरजिल्हा बदली करून साधारण ९०० शिक्षक आजपर्यंत हजर झालेले आहेत.अहमदनगर जिल्ह्यामध्ये हजर झाल्यानंतर सदर कर्मचाऱ्यांची सेवाजेष्ठता शून्य झालेली असून त्यामुळे या शिक्षकांना पदोन्नतीमध्ये लाभ मिळत नाही. त्यामुळे आर्थिक हानी मोठ्या प्रमाणात होत आहे. ही बाब लक्षात घेऊन व शिक्षकांवरील अन्याय दूर करण्यासाठी व सर्व सामान्य शिक्षकांना न्याय देण्यासाठी प्रहार शिक्षक संघटना अहमदनगर यांच्या वतीने शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शासकीय आदेशानुसार लाभ देण्याची मागणी करण्यात आली.
या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोदभाऊ परदेशी,प्रहार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना अहमदनगर संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय देठे, कार्यध्यक्ष अनिल विधाटे, सचिव मिलिंद अंत्रे, उपाध्यक्ष किरण खरात, गोरक्षनाथ मेहत्रे, राजेंद्र सूर्यवंशी, प्रकाश जंबे, आनंद खरोटे, अनंत गोरे, शशिकांत अंत्रे, कुषाबा पालाटे, भागवत घुले, संपर्कप्रमुख सचिन शेरकर, प्रसिद्धी प्रमुख हरी तांबडे आदींची उपस्थित होती. तसेच विविध तालुक्यातून संघटनेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
Tags :
37854
10





