महाराष्ट्र
69304
10
विडी कामगार आई अन बाप पेंटर असणाऱ्या चा मुलगा झाला सहाय्यक विक्रीकर आयुक्त
By Admin
विडी कामगार आई अन बाप पेंटर असणाऱ्या चा मुलगा झाला सहाय्यक विक्रीकर आयुक्त
अकोले ( प्रतिनिधी )
अकोले तालुक्यातील कोतुळ येथील आई विडी कामगार व बाप पेंटर असणाऱ्यांचा मुलगा श्री. संतोष (शिवा) शेळके यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत महाराष्ट्र राज्य सहाय्यक विक्रीकर आयुक्त (असिस्टंट कमिशनर ऑफिसर स्टेट ऑफ महाराष्ट्र) या पदावर नियुक्ती झाली आहे.
चित्रपटाच्या कथानक ला शोभेल अशी गोष्ट आदिवासी अकोले तालुक्यातील कोतुळ सारख्या गावात पेंटर असणाऱ्या व फावल्या वेळात बातमीदारी करणारा अशोक शेळके व त्याच्या घरात अठरा विश्व दारिद्र असणारे प्रपंचला विड्या बांधून हातभार लावणारी त्याची पत्नी शांता शेळके, घरात चार मूल असा कुटुंब आहे. मुलांना आपल्या आई बापाची परिस्थिती ची जाणीव झाली होती. त्यामुळे त्यांनी शिक्षण घेऊन मोठ होण्याचं स्वप्न पाहिलं. सुपुत्र संतोष (शिवा) शेळके हा कोतुळ येथील कोतुळेश्वर विद्यालयात दहावीच्या केंद्र परीक्षेत केंद्रात पहिला, नासिक येथे मेकॅनिकल इंजिनियर ला पहिला, तर राज्य लोकसेवा आयोग परीक्षेतही क्लास वन, व टू अशा दोन परीक्षेत यश मिळवत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. प्रथम लोकसेवा आयोगातील मंत्रालयीन सहायक कक्ष अधिकारी हे पदा ची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्या पदा वर रुजू झाला तोच महाराष्ट्र राज्य सहाय्यक विक्रीकर आयुक्त या क्लास वन पदाची परीक्षा उत्तीर्ण झाला. हा शिवाचा प्रवास सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा ठरला आहे.
अत्यंत खडतर प्रवासातून व गरिबीच्या परिस्थितीतून मार्ग काढीत, मंत्रालय कक्ष अधिकारी, विक्रीकर आयुक्त हे पद प्राप्त केले. या प्रवासात अनेक ग्रामस्थ व नातेवाईक यांनी वेळप्रसंगी मोलाची मदत तर केलीच पण यात आईवडिलांचे अपार कष्टही विसरता येणार नाही. आई विडी कामगार, तर वडील पेंटर असल्याने तुटपुंज्या प्रपंचातुन शिवाने आपली जिद्द व चिकाटी कायम ठेवीत आपल्या उच्च ध्येयाला अखेर गवसणी घातली. शिवाचा हा खडतर प्रवास आजच्या युवा पिढीला एक आदर्श निर्माण करणारा असाच आहे.
शिवाने आपला अभ्यास सांभाळून आपल्या दोन बहिणींनाही योग्य मार्गदर्शन केल्याने त्यांची पण आरोग्य विभागात पुणे व ठाणे येथे निवड झाली आहे.
या आनंदात वाजत गाजत फुलांच्या वर्षावात हार तुरे फेटे बांधून गावाने मिरवणूक आई वडिलांना च्या सोबत काढली. अन आई वडिलांच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले.
कोट:- एकाग्रतेने चांगला अभ्यास केला तर परिस्थिती वर मात करता येते . मग यश आपल्या पायाशी लोटांगण घेईल हे आजच्या युवा पिढी ने ध्यानात घ्यावे
- श्री. संतोष शेळके
Tags :

