कवी बाळासाहेब कोठुळे साहित्यभूषण पुरस्काराने सन्मानित
पाथर्डी प्रतिनिधी-
श्रीरामपूर तालुक्यातील लोककला कलावंत साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा साहित्यभूषण पुरस्कार यावर्षी पाथर्डी तालुक्यातील चितळी येथील ज्येष्ठ कवी बाळासाहेब कोठुळे यांना सुप्रसिद्ध चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला . यावेळी डॉक्टर बाबुराव उपाध्ये निवृत्त पोलीस अधिकारी कवी सुभाष सोनवणे, प्राचार्य गुंफाताई कोकाटे आला बाबूराव फेम सुरेश कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा वडाळा महादेव येथील ग्रामपंचायत सभागृहामध्ये मोठ्या थाटात संपन्न झाला.
कथा कविता राजकीय वात्रटिका चारोळी विडंबन, हास्य कविता, लेख ,निबंध असा गेली तीस वर्ष साहित्याचा प्रवास करत कवी कोठुळे यांनी आत्तापर्यंत पत्रकारिते सहित 55 पुरस्कार प्राप्त केले आहेत.2023 मध्ये सहा पुरस्कार त्यांना मिळाले आहे त्यामध्ये कृष्णा भोजनालय साहित्य मित्र मंडळाच्या वतीने आदर्श शेतकरी पुरस्कार आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते त्यांना मिळाला आहे तसेच श्री क्षेत्र हनुमान टाकळी येथील कै.आसाराम गायकवाड , आदर्श कवी पुरस्कार, डब्लू सी पी ए चा आदर्श सूत्रसंचालक पुरस्कार, अमेरिकेचा इंटरनॅशनल अवार्ड (पत्रकारिता)लोक कलावंत साहित्यिक मंच चा साहित्यभूषण पुरस्कार तसेच पारनेर येथील पैलवान नानासाहेब डोंगरे प्रतिष्ठानचा आदर्श साहित्यिक पुरस्कार त्यांना मिळाला आहे त्यांच्या या यशाबद्दल न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक बाळासाहेब ताठे छत्रपती संभाजी नगर येथील उद्योजक अशोक दादा आमटे, क्रिएटिव फाउंडेशन चे अध्यक्ष निलेश दौंड सर या सर्वांनी कवी कोठुळे यांचे अभिनंदन केले