महाराष्ट्र
27209
10
आनंदी राहण्यासाठी मनाची मशागत महत्त्वाची असते - डॉ.संज्योत वैद्य
By Admin
आनंदी राहण्यासाठी मनाची मशागत महत्त्वाची असते - डॉ.संज्योत वैद्य
स्व. दादा पाटील राजळे यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त स्मृती व्याख्यानमाला
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील
दादा पाटील राजळे महाविद्यालय आदिनाथनगर येथे स्व. दादा पाटील राजळे यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त आयोजित १८ व्या वर्षाच्या स्मृती व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी डॉ. संज्योत वैद्य यांनी "आनंदाचे डोही आनंद तरंग" या विषयावर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफले. अधुरेपणामुळे आपण आपला आनंद कमी करत असतो. रोज वेगवेगळ्या भूमिका निभावताना कमीपणाची भावना तयार होते, हीच भावना दुःखास कारणीभूत ठरत असते. आजूबाजूच्या परिस्थितीचा आपल्या विचारावर होणारा परिणाम दुखास कारणीभूत ठरतो, व आनंदावर विरजण पडते म्हणून मनाची मशागत महत्त्वाची आहे. असे त्यांनी सांगितले. आपण आपला अहंभाव बाजूला ठेवला पाहिजे व दुसऱ्याचे कौतुक केले पाहिजे म्हणजे तोही आनंदी होतो व आपणही आनंदी राहतो. यावेळी त्यांनी अनेक दाखले, उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा आमदार मोनिकाताई राजीव राजळे यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये गेल्या सतरा वर्षाच्या व्याख्यानमालेचा उद्देश समजावून सांगुन प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवावी. सोशल मीडियावरील नकारात्मक गोष्टींकडे लक्ष न देता सकारात्मक गोष्टी अंगीकाराव्यात तसेच व्याख्यानमालेसाठी पालकांसह विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले. व्याख्यानमालेमध्ये महाराष्ट्रातील नामवंत व्याख्याते बोलावले असून त्या संधीचा फायदा सर्वांनी करून घ्यावा असे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास रामकिसन आबा काकडे , सुभाषराव ताठे , सुभाष बर्डे , कुशीनाथ बर्डे , बाबासाहेब किलबिले , नारायणराव काकडे , साहेबराव सातपुते , विक्रमराव राजळे , जे. आर . पवार साहेब , आर. जे. महाजन साहेब , भास्करराव गोरे साहेब , शेषराव कचरे , शामूनाना राजळे , आर. वाय . म्हस्के सर , शामराव गरड सर , दत्तात्रय भगत सर , साखरे सर , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजधर टेमकर , अशोक काळे , सुनील पानखडे , दादा मरकड , ताठे सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.साधना म्हस्के यांनी केले . सूत्रसंचालन डॉ.निर्मला काकडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. योगिता इंगळे यांनी केले
Tags :
27209
10





