महाराष्ट्र
11415
10
शेवगाव दंगल;आरोपींच्या पुरवणी यादीत आणखी नवे वाढण्याची शक्यता !
By Admin
शेवगाव दंगल;आरोपींच्या पुरवणी यादीत आणखी नवे वाढण्याची शक्यता !
शेवगाव- प्रतिनिधी
मला लाज वाटते शेवगावकर म्हणऊन घ्यायला माझं शेवगांव असं नव्हतं अठरापगड जाती काही वर्षांपुर्वी गुण्या गोविब्दानें नांदत होत्या एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होत होत्या.
काही सडक्या मेंदूच्या लोकांच्या सुपीक डोक्यातून गेल्या काही महिन्यांपासून कायम शहराचे वातावरण कसे अशांत राहील यांचे जाणीवपूर्वक प्रयत्न पडद्या आड सुरु होतें गुपित मिटिंग घेऊन राडा करण्याचे सुनियोजित प्लॅन काही अतिमहत्वाकांक्षी लोक करत होतें अलीकडे शहरात दोन नंबरच्या धंद्यांना ऊत आला होता त्यातून राजकीय सुंदोपसुंदी सुरु झाली होती अनेकांच्या राजकीय महत्वाकांक्षा वाढल्या होत्या जुन्या जाणत्या नेत्यांनी शहराकडे साफ दुर्लक्ष केले काही बाहेरच्या दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी शहराच्या राजकारणात लक्ष घातले होतें "ज्यांना खायला आणि खरंडायला नाही" अश्यानी सुद्धा जातीपाती चे विष तरुणांमध्ये बेमालूमपणे पसरवले आज एका घटनेने सगळ्याचे टांगापलटी घोडे फरार झाले "तेरा कफन मेरे कफनसे सफेद कैसा" ??? यां वृत्तीतून याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरात छत्रपती संभाजी महाराजांच्या मिरवणुकीत दंगल घडली? त्याची प्रतिक्रिया संपुर्ण अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रात उमठली आहे. काल पाथर्डी शहरात अघोषीत बंद पाळण्यात आला होता. शेवगांवच्या पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन दोन्ही गटाच्या लोकांवर फिर्याद देऊन गुन्हे दाखल करून काही समाजकंटकांना अटक करण्यात आली अशा घटना का घडतात?अशा घटना घडू देण्यासाठी शासन प्रशासनाचा अक्षम्य हलगर्जी पण जबाबदार आहे का??? असे अनेक सर्वसामान्य नागरिकांचे मतं आहे अशा घटना पुन्हा शहरात घडू नयेत यासाठी देशावर प्रेम करणाऱ्या देशभक्त नागरीकांना ऑनलाईन एकत्र येण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
*दंगली घडू देण्यासाठी राजकिय पक्षांच्या व्होट बँक, जमा करण्याच्या प्रवृत्तीला जबाबदार धरावेच लागेल* *महाराष्ट्रातील बहुतेक राजकिय पार्ट्या, व्होट बँकेचे उदिष्ट डोळ्यासमोर ठेवून अशा दंगलीकडे गांभिर्याने न पहाता,दंगली घडविणाऱ्या मनोवृत्तीच्या लोकांना छुपा पाठिंबा देत असतील????* तर त्यावर कायमचा उपाय शोधण्यासाठी समाजातील बुध्दीजीवी सज्जन नागरीकांची मते जाणुन घेण्यासाठी, सर्वच पातळीवर कामं व्ह्ययला पाहिजे शासन आणि प्रशासनाला कायमचा उपाय करता येऊ शकतो? परंतु तज्ञांच्या सल्ल्यानेच ठोस उपाययोजना करण्याचा सामूहिक विचार होणे गरजेचे आहे शेवगाव येथे रविवारी रात्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमीत्त निघालेल्या मिरवणुकी दरम्यान दोन गटात झालेल्या दगडफेकीचे पडसाद आज मंगळवारी देखील कायम आहेत. याप्रकरणातील सर्व आरोपींना अटक केल्याशिवाय शेवगाव बंद मागे घेण्यात येणार नाही अशी भुमिका सकल हिंदु समाज व व्यापा-यांनी घेवून मगळवारी दुसर्या दिवशीही शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला .
या प्रकरणी ११२ जणांवर व अन्य अज्ञात शे दिडशे जणावर गुन्हे दाखल झाले असून त्यातील २९ जणांना सोमवारी अटक करण्यात आली होती. तर आज सायंकाळ अखेर आणखी संशयीत ९ जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून विविध सीसी टीव्ही फुटेजच्या आधारे युद्ध पातळीवर शोध मोहिम सुरु आहे. सोमवारी ताब्यात घेतलेल्या २९ जणांना न्यायालयाने ४ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
*काल सकाळी संताजी महाराज मंदिरात अप्पर पोलिस अधिक्षक प्रशात खैरे, उपअधिक्षक संदीप मिटके, पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांचे उपस्थितीत व्यावसायिक व ग्रामस्थानी बैठक घेऊन निवेदन दिले .
हिंदू समाजाच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदर मिरवणुक शांततेत सुरु असतांना छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहचल्यावर अचानक हाँटेल सहारा, खाटीक गल्ली व मस्जिदीच्या बाजूने मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. यावेळी पाकीस्तान जिंदाबाद, पी.एफ.आय जिंदाबाद, अल्लाहू अकबर अशा घोषणा देत सशस्त्र हल्ला केला. यातील दंगलखोर व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, सोनार पेठ येथील सर्व हिंदूंच्या दुकानावर, पेशवेकालीन गणपती मंदिरावर हल्ला करुन नुकसान केले. दुचाकी, चारचाकी वाहनांचे तोडफोड करुन नासधुस केले. मारवाड गल्ली, जैन गल्ली, धनगर गल्ली वडारगल्ली, भाडाईत गल्ली, राम मंदिर बोळ या भागातील महिलांना अश्लिल भाषेत शिवीगाळ करुन लज्जा उत्तन्न होईल असे वर्तन केले. त्यामुळे या महिला आज देखील दहशतीखाली आहेत. तसेच पैठण रोड, क्रांती चौक, मिरी रोड या भागातील रस्त्याने येणाजाणा-या महिलांना देखील मारहाण केली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सर्व हातगाडया, पाल टाकून बसणारे दुकानदार, पानटप-या, मावा टप-या काढून टाकण्यात याव्यात. शहरातील शनिमारुती मंदिरा शेजारील अनधिकृत कत्तलखाने व तेथे होणारी गोवंश हत्या त्वरीत बंद करावी. तसेच हिंदू समाजाच्या तरुणांवर दाखल केलेले खोटे गुन्हे त्वरीत मागे घ्यावेत अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
तर मुस्लिम समाजाच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदर मिरवणुक छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मर्कज मश्जिदीसमोर आल्यावर पुर्व नियोजीत व जाणीवपुर्वक विचीत्र प्रकारच्या घोषणा देवून मश्जिदीवर दगडफेक केली. तसेच मश्जिदीमध्ये घुसून तेथे नमाजपठण करणा-या वयस्कर व्यक्तींना जातीवाचक शिव्या देत तुम्हाला संपवून टाकू असे म्हणत दानपेटी फोडून त्यातील सुमारे ४० ते ५० हजार रुपये रोख रक्कम घेवून लंपास केली. मुस्लिम समाजाची दुकाने फोडून जाळपोळ केली. यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या असून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणा-या समाजकंटकावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उप विभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके, पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी आज हिंदू व मुस्लिम दोन्ही समाजातील नागरीकांशी चर्चा केली. दंगलीमध्ये सहभागी असणा-यांवर गुन्हे दाखल केले असून त्यांना त्वरीत अटक करण्यात येईल. तसेच *शहरातील अतिक्रणे का़ढण्यासाठी नगरपरीषदेने सुरुवात केल्यास त्यांना त्वरीत बंदोबस्त देण्यात येईल अशी ग्वाही खैरे यांनी दिली.
ताजा कलम
प्रमुख पक्षांचे पदाधिकारी गुन्हयात अडकले... शेवगाव दगडफेक प्रकरणी पोलीसांनी ज्या ११२ जणांविरुध्द जिवे मारण्याचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा व कर्मचा-यांस मारहाण, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान अशा गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. त्यात वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख, माजी उपनगराध्यक्ष वजीर पठाण, मनसेचे तालुकाप्रमुख गणेश रांधवणे, शिवसेना ( शिंदे गट) तालुकाप्रमुख अशुतोष डहाळे, माजी नगरसेवक सागर फडके, कैलास तिजोरे, बाजार समितीचे नुतन संचालक जाकीर कुरेशी, कम्युनिष्ठ पक्षाचे संजय नांगरे आदी सह अनेक कार्यकर्त्याचा समावेश आहे.
आरोपींच्या पुरवणी यादीत आणखी नवे वाढण्याची शक्यता !!!माझं शांत संयमी एक्नेकाना समजुन घेणार जुन निरगस शहर परत देईल का
Tags :
11415
10





