महाराष्ट्र
विद्यार्थ्यांनी व्यसनापसून दूर रहावे.- डाॕ.डोंगरे
By Admin
विद्यार्थ्यांनी व्यसनापसून दूर रहावे.- डाॕ.डोंगरे
राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर उत्साहात संपन्न
पाथर्डी- प्रतिनिधी
श्री दादापाटील राजळे शिक्षण संस्थेचे, दादापाटील राजळे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आदिनाथनगर, ता- पाथर्डी, जि- अहमदनगर, आयोजित सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर 2023 मढी येथे दि. 11 ते 17 जानेवारी 2023 रोजी संपन्न झाले.
या समारोपाच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मा. श्री रामकिसन काकडे, उपाध्यक्ष, वृ. सह. सा. का. लि. आदिनाथनगर तर प्रमुख पाहुणे मा. प्राचार्य डॉ. एम. एल. डोंगरे, जामखेड महाविद्यालय, जामखेड हे उपस्थीत होते.
समारोप कार्यक्रम प्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. प्राचार्य डॉ. एम. एल. डोंगरे यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात विद्यार्थ्यांवर सामाजिक संस्कार घडतात हे संस्कार आयुष्य घडविण्यासाठी खूप मोलाचे असतात. यातूनच देशाचे भावी नागरिक घडतात त्यासाठी आजच्या विद्यार्थ्यांनी व्यसनापसून दूर रहावे असे आवाहन केले.
यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष, रामकिसन काकडे,
यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातील विद्यार्थ्यांनी केलेल्या श्रमदानाचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर जामखेड महाविद्यालयाचे माजी प्राचार्य अविनाश फलके, कार्यक्रम अधिकारी, जामखेड महाविद्यालय, जामखेड, मा. श्री. श्रीकांत मिसाळ, संचालक वृ. सह. सा. का. लि. आदिनाथनगर, मा. श्री नवनाथ मरकड, सचिव, कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट मढी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांनी शिबिराच्या समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
कु. श्रध्दा कचरे या विद्यार्थिनीने अहवाल वाचन केले. फुलशेटे प्रतिक, खोजे महेश, कु. गरूड तनुजा या स्वयंसेवकांनी शिबिरातील अनुभव व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी मा. श्री. शंकरराव पाखरे, उपाध्यक्ष, वि. का. सो. मढी, मा. श्री बाबासाहेब किलबिले, नारायण काकडे, संचालक, वृ. सह. सा. का. लि. आदिनाथनगर, मा. सौ. शिदोरे मॅडम, तसेच कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे सर्व विश्वस्त, मढी ग्रामपंचायत चे सरपंच, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. त्याचबरोबर दादापाटील राजळे महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. एम. एस तांबोळी, डॉ. जे. एन. नेहूल, डॉ. एस. जे. देशमुख, डॉ. आर. टी. घोलप, डॉ. एस. बी. देशमुख, डॉ. एस. आर. भराटे, डॉ. जी. बी. लवांडे, डॉ. डी. एन. कांडेकर, डॉ. के. जी. गायकवाड, डॉ. अतुलकुमार चौरपगार, प्रा. सी. एन. पानसरे, तसेच सर्व प्राध्यापक व सेवक वृंद उपस्थित होते.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी श्री क्षेत्र मढी देवस्थानचे अध्यक्ष बबनराव मरकड,मा.संजय मरकड, मा.रविंद्र आरोळे मा.नवनाथ मरकड आणि कार्यक्रम अधिकारी डॉ. साधना म्हस्के, प्रा. अस्लम शेख, प्रा. योगिता इंगळे, डॉ. नितीन भिसे आणि श्री शिवाजी बर्डे यांनी विशेष श्रम घेतले.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कार्यक्रम अधिकारी प्रा. आसाराम देसाई यांनी केले. सूत्रसंचालन भवार श्वेता व पठाण अयेशा या विद्यार्थिनींनी केले.
Tags :
302918
10