महाराष्ट्र
पाथर्डी, राहुरी,नगर तालुक्यांतील पाणी दूषित, 12 गावांमध्ये निकृष्ट ब्लिचिंग पावडर
By Admin
पाथर्डी, राहुरी,नगर तालुक्यांतील पाणी दूषित, 12 गावांमध्ये निकृष्ट ब्लिचिंग पावडर
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा, यासाठी सरकार पातळीवरून प्रयत्न होऊनदेखील केवळ ग्रामपंचायतींच्या दुर्लक्षामुळे ग्रामीण भागात पिण्याचे पाणी दूषित असल्याचे समोर येत आहे.
डिसेंबर महिन्यात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या पाणी नमुने तपासणीत जिह्यात नगर तालुक्यातील 21, पाथर्डी तालुक्यातील 12 आणि राहुरी तालुक्यातील 8 गावांतील पिण्याच्या पाण्याचे नमुने दूषित आढळले आहेत.
ग्रामीण भागातील जनतेला पुरवठा होणाऱया पाण्याचे नमुने दर महिन्याला तपासण्यासाठी गावपातळीवर जलसुरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे जलसुरक्षक नियमितपणे पाण्याचे नमुने घेऊन प्रत्येक तालुक्याला असणाऱया भूजल सर्वेक्षण विभागाच्या प्रयोगशाळेसह पब्लिक हेल्थ लॅबकडे तपासणीसाठी जमा करतात. त्यानंतर येणाऱया तपासणी अहवालाची माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाला सादर करण्यात येते. ग्रामीण भागात पिण्याचे पाणी, त्या पाण्याचा स्त्र्ााsत दूषित होऊ नये, यासाठी प्रयत्न करण्यात येतात. तसेच पाणी शुध्दीकरणासाठी नियमित ब्लिचिंग पावडचा वापर करत पाण्यात 20 टक्क्यांपेक्षा कमी क्लोरीन असल्यास ते पिण्यास योग्य नाही, असे कळविण्यात येते.
दूषित पाणी असणारी गावे
z डिसेंबर महिन्यात नगर तालुक्यातील वाकोडी, आगडगाव, पिंपळगाव लांडगा, बाराबाभळी, अकोळनेर, हिवरेबाजार, पिंपळगाव वाघा, निमागाव घाणा, गुंडेगाव, जखणगाव, हमीदपूर, पिंपळगाव माळवी, खोसपुरी, उदरमल, आव्हाडवाडी, कामरगाव, भोयरे पठार, चास, डोंगरगण, इमामपूर, बहिरवाडी. अकोले तालुक्यातील रुंभोडी. पारनेर तालुक्यातील वाळवणे, खडकवाडी. पाथर्डी तालुक्यातील अगसखंड, येळी, मिडसांगवी, दुलेचांदेगाव, देवरी, राघु हिवरे, भिलवडे, अल्हानवाडी, मांडवे, चिंचपूर पांगुळ, गितेवाडी, बोरसे वाडी, सोमठाणे नलावडे. शेवगाव तालुक्यातील वडुले खु, बेलगाव, प्रभू वडगाव, येरंडगाव समासुद, भातकुडगाव. राहाता तालुक्यातील जळगाव. राहुरी तालुक्यातील गांणगापूर, संक्रापूर, चांदेगाव, बारागाव नांदूर, सडे, पिंपरी अवघड, राहुरी खु, गोटुंबे आखाडा. संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव कोंझिरा, जवळे बाभळेश्वर, अकलापूर, समनापूर. श्रीगोंदा तालुक्यातील खांडगाव, पिसोरेखांड, वलघुड. श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे येथील पाणी नमुने दूषित आढळले आहेत.
Tags :
50407
10