महाराष्ट्र
72971
10
सुसरे गावातील ग्रामस्थामध्ये भीतीचे वातावरण
By Admin
सुसरे गावातील ग्रामस्थामध्ये भीतीचे वातावरण
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील सुसरे गावात काही दिवसापुर्वी चोरी करण्याचा हेतूने गावामध्ये चोर आले. चोरी करण्यासाठी घराच्या वाडग्यात शिरले. पण त्या घरातील एक महिला अचानकपणे जागी झाली व तिने चोराला बघितले घाबरून ओरडायला लागली चोर तिथून पळाले पण पळ काढत असताना अज्ञात चोर व्यक्तीचा मोबाईल त्या ठिकाणी पडला लोक जमा झाले. गावच्या पोलीस पाटलांनी पाथर्डी तालुका पोलीस स्टेशनला कॉल केला असता पोलीसांची गाडी रात्री गावात आली व गावात विचार पूस करत चोरांचा मोबाईल घेवून गेली दुसऱ्या दिवशी सकाळी गावचे सरपंच दादासाहेब कंठाळी, ,उपसरपंच श्री. उदागे तसेच गावातील ग्रामपंचायत सदस्य तसेच
पन्नास- साठ ग्रामस्थ गावात या घटनेसंबधी संबंधी चर्चा केली. पाथर्डी पोलीस स्टेशन ला गेले तिथे ठाणे अंमलदार साहेबाला भेटले त्यांना आमची तक्रार नोंदवून घ्या असे ग्रामस्थ म्हणाले.परंतु त्यांनी तक्रार घेतली नाही ते म्हणाले की, पी एस आय संतोष मुटकुळे यांना भेटा यानंतर ग्रामस्थ पी आय मुटकुळे साहेबाना भेटले असता त्यांनी सांगितले की, तुमच्या गावच्या या अगोदर तीन चार तक्रारी नोंदवलेल्या आहेत त्या फाईल ओपन करू तसेच मोबाईल चौकशीसाठी वरीष्ठ कार्यलयाकडे पाठवलेला आहे. त्याचा तीन दिवसात अहवाल येईल अहवाल आला की आपण अज्ञात तसेच चोरांना अटक करू असे सांगितले.
चार दिवसांनी ग्रामस्थ पुन्हा पाथर्डी पोलिस स्टेशन येथा आले असता सुसरे बिटचे हवालदार श्री. दराडे यांनी सांगितले की, अहवाल अजुन आला नाही.पुन्हा आठ दिवसांनी ग्रामस्थ गेले असता त्यांनी परत उडवा उडवीचे उत्तरे दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी पाथर्डी तालुक्याच्या लोक्रतिनिधी आमदार मोनिका राजळे यांनी पी आय मुटकुळे यांना संपर्क साधला असता मुटकुळे साहेब म्हणाले की, एक अज्ञात व्यक्तीचे नाव आमच्याकडे आले आहे, आपल्याकडे त्याला दोन दिवसात उचलतो.पुन्हा चार दिवस झाले काहीच कारवाई नाही. त्यानंतर ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींच्या स्विय सहाय्यक शी संपर्क केला त्यांनी दोन वेळा कॉल केला तरीही पी आय मुटकुळे यांनी काही कारवाई झाली नाही.यामुळे गावातील अज्ञात चोराला न पकडल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या वर्षभरात सुसरे गावातील परीसरात चाळीस शेळ्या ,तीन मोटासायकल चोरी गेल्या आहेत. पण पोलीसच चोरांना पाठीशी घालतात मग आम्ही जायचं कोणाकडे, पोलीस लोकप्रतिनिधीचे कोणी ऐकायला तयार नाहीत.म्हणून गावातील ग्रामस्थ जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय अहमदनगर येथे उपोषण करणार आहेत.अशी माहीती ग्रामपंचायत सदस्य गणेश उदागे तसेच इतर ग्रामस्थ यांनी दिली आहे.
Tags :

