टाकेद विद्यालयास तालुका विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांकाची दोन पारितोषिके मिळून जिल्हा स्तरावर निवड
नाशिक - प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील सर्वतिर्थ टाकेद येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॕलेज टाकेद विद्यालयास वाडीव-हे येथे (दि.10 ,11) झालेल्या तालुका विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांकाची दोन पारितोषिके मिळून जिल्हा स्तरावर निवड झाली.
दोन्ही उपकरणांना प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक या सर्वांचे विद्यालयाचे प्राचार्य साबळे सर , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , भारत सर्व सेवा संघाचे सन्माननीय अध्यक्ष श्री. राजेंद्र नलगे साहेब,
व सन्माननीय सचिव श्री. प्रकाश जाधव साहेब तसेच संस्था इतर सदस्य व पदाधिकारी तसेच टाकेद व टाकेद परिसरातील सर्व ग्रामस्थ,माजी विद्यार्थी व शाळेतील विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.व शुभेच्छा दिल्या.