पाथर्डी तालुक्यात हर्षदा काकडेंचीही मतदार संघात दावेदारी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
आपणही पाथर्डी तालुक्यात लक्ष घालणार असल्याचे सांगून जिल्हा परिषद माजी सदस्या हर्षदा काकडे यांनी आगामी काळात होणार्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारीचे दावेदार असल्याचे सूचक वक्तव्य केले.
आपल्याला सध्या पाथर्डी तालुक्यात यायला आवडेल,' असे म्हणाल्याने आता, आगामी शेवगाव-पाथर्डी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात हर्षदा काकडे असू शकतात, या वक्तव्याने स्पष्ट संकेत मिळत आहेत. पाथर्डी शहरातील पद्मश्री वसंतदादा पाटील विद्यालयात संस्थेचा संस्थापक सहदेवदादा शिरसाट यांच्या जयंतीनिमित वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा आयोजित केला. यावेळी उज्ज्वला शिरसाठ, बंडू बोरूडे, महेंद्र शिरसाट, डॉ. कुलदीप भांडकर, हुमायून आतार, पप्पू चौनापुरे, सुरेश मिसाळ, मंदाकिनी शिरसाट, सुनील शिरसाट, अविनाश पालवे, मल्हारी शिरसाठ, सुभाष भंडारी, महेश भताने, प्राचार्य चंद्रकांत खाडे, अशोक खेडकर आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थिनी प्रेमा सोनवणे हिला लंडनमध्ये नोकरी मिळाल्या बद्दल तिचा गौरव करण्यात आला.
काकडे म्हणाल्या, पाथर्डी शेवगाव मतदार संघ विकास कामाचे कुठेच काही नाही. पाथर्डी तेच आणि शेवगावमध्ये तेच विकास कामाच्या नावाने बोंबाबोंब चालली आहे. या सर्व चाललेल्या प्रकारामुळे आपण या तालुक्यात लक्ष घालणार असून, आगामी काळात होणार्या विधानसभा निवडणुकीत आपण ही दावेदार असल्याचे संकेत त्यानी रणशिंग फुंकलेे. स्व. शिरसाट मला मुली सारखे वागवायचे. ते स्वतः कमी शिकले असले तरीही त्यांनी शिक्षणसंस्था काढून उसतोड मजुरांच्या मुलांना शिक्षणाची दारे खुली करून दिली. त्यांच्या या निर्णयाने उसतोड मजुरांची मुले चांगल्या पदावर जात आहेत, असे काकडे म्हणाल्या. चंद्रकांत खाडे यांनी प्रास्ताविक केले. सुरेश मिसाळ यांनी सूत्रसंचालन केले. संजय सोनवणे यांनी आभार मानले.