प्रशांत भालेराव यांचे कार्य तरूणांना उर्जा देणारे- डॉ. कृषिराज टकले
शेवगाव- प्रतिनिधी
ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार हजारो तरुणांना रोजगार रेणुका माता मल्टीस्टेटच्या माध्यमातून
मिळाला आहे. याचे सर्व श्रेय रेणुका माता मल्टि स्टेटचे चेअरमन प्रशांत भालेराव यांना जाते.एक आदर्श उद्योजक म्हणून प्रशांत भालेराव यांच्या कडे पाहिले जाते. तरुणांना व्यावसायिक प्रगती करायची असेल तर श्री भालेराव यांचा आदर्श घेतला पाहिजे असे प्रतिपादन स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष डॉ कृषिराज टकले यांनी केले.
शेवगाव तालुक्यातील अमरापूर येथील
रेणुकामाता देवस्थान वर वासंतिक नवरात्र सुरू आहे या नवरात्रोत्सवाचे आयोजन श्री प्रशांत भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली असते. या नवरात्रोत्सवास स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष डॉ कृषिराज टकले, जिल्हा अध्यक्ष अंकुश डांभे, श्री लांडे , अमोल म्हस्के,चितळीचे युवा नेते नवनाथ वाघ यांनी भेट दिली त्याप्रसंगी डॉ. टकले यांनी मत व्यक्त केले . यावेळी स्वाभिमानी मराठा महासंघाचे पदाधिकारी यांचा देवस्थानच्या वतीने सत्कार प्रशांत भालेराव यांनी केला.
तरुणांना मार्गदर्शन करुन रोजगार देणे व शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम रेणुकामाता मल्टि स्टेट करत आहे हे सर्व जगदंब मातेच्या आशिर्वादा शिवाय शक्य नाही असे मत यावेळी स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. कृषिराज टकले पाटील यांनी व्यक्त केले.