ज्ञानेश्वरी वाघ, अंबिका वाटाडेची वेस्टझोन महिला क्रिकेट संघात निवड
पाथर्डी- प्रतिनिधी
झोनल क्रिकेट स्पर्धेकरिता पाथर्डी येथील एस. व्ही. नेट क्रिकेट अकॅडमीच्या महिला क्रिकेट खेळाडू ज्ञानेश्वरी वाघ व अंबिका वाटाडे यांची वेस्टझोन संघात निवड करण्यात आली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे मार्फत झालेल्या सीनियर महिला क्रिकेट स्पर्धेमध्ये एस. व्ही. नेट क्रिकेट अकॅडमीच्या महिला खेळाडू ज्ञानेश्वरी वाघ व अंबिका वाटाडे यांची भुवनेश्वर, ओडीसा येथे १४ मार्च २०२३ रोजी होणाऱ्या झोनल क्रिकेट स्पर्धेसाठी वेस्टझोन संघामध्ये निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बबनराव ढाकणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ॲड. प्रताप ढाकणे, जिल्हा परिषद सदस्या प्रभावती ढाकणे यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.
वाघ आणि वाटाडे या महिला खेळाडूंना एस. व्ही. नेटचे मुख्य प्रशिक्षक शशिकांत नि-हाळी व अतिश नि-हाळी यांचे कडून गेल्या १० वर्षापासून प्रशिक्षण चालू असून त्यांना वेळोवेळी ते मार्गदर्शन करत आहेत.
त्यांच्या या निवडीबद्दल पाथर्डी तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यात त्यांचे कौतुक होत असून सर्व स्तरावर त्यांचे अभिनंदन होत आहे.