कवडदरा विद्यालयास तालुका विज्ञान प्रदर्शनास प्रथम क्रमांकाचे दोन पारितोषिके मिळवत जिल्हास्तरावर निवड
नाशिक - प्रतिनिधी
इगतपुरी तालुकास्तरीय 46 वे तालुका विज्ञान प्रदर्शनात न्यू इंग्लिश स्कूल व जुनिअर कॉलेज कवडदरा या विद्यालयाला घवघवीत असे यश मिळाले आहे.
पूर्व प्राथमिक गटात स्मार्ट ओनियन कटर उपकरणात
प्रथम क्रमांक मिळवला आहे.यामध्ये
कु. शिवकन्या डिगंबर गिरी
कु. अक्षदा शाम जाधव हे विद्यार्थी सहभागी होत यश मिळवले.यांना श्री. श्रीराम शंकर लोहार, श्री. प्रमोद एकनाथ परदेशी यांचे मार्गदर्शन मिळाले.
माध्यमिक गटात स्मार्ट इन्होलोप या उपकरणात
प्रथम क्रमांक मिळवला आहे.
या मध्ये
कु. स्वराली श्रीराम लोहार
कु. विद्या ज्ञानेश्वर जुंदरे यांनी सहभाग घेतला.यांना
श्री. श्रीराम शंकर लोहार
श्री. प्रमोद एकनाथ परदेशी यांचे मार्गदर्शन मिळाले.
दोन्ही उपकरणांना प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक या सर्वांचे विद्यालयाचे प्राचार्य कांबळे सर , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , भारत सर्व सेवा संघाचे सन्माननीय अध्यक्ष राजेंद्र नलगे साहेब,
व सन्माननीय सचिव श्री. प्रकाश जाधव साहेब तसेच कवडदरा व कवडदरा परिसरातील सर्व ग्रामस्थ , मान्यवर यांच्याकडून अभिनंदन होत आहे.