महाराष्ट्र
बीओटी बस स्थानक विकासक आर.एम.कातोरे
By Admin
बीओटी बस स्थानक विकासक आर.एम.कातोरे यांना अवेध गौण खनिज प्रकरणी ३,६६,२२८६९/- रुपये दंड
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
संगमनेर येथील BOT तत्वावरील बस स्थानक व व्यापारी संकुल बांधकाम मध्ये अवैध गौण खनिज विनापरवाना अवेध वापर करून विकासक आर.एम.कातोरे यांनी गौण खनिज (वाळू, मुरूम, डबर) विशेषता वाळूचा कुठलाही लिलाव संगमनेर येथे झालेला नसताना याकामासाठी मोठ्या प्रमाणात प्रवरा, मुळा नदीपात्रातून वाळू तस्करी करून हे बांधकाम केलेले आहे तसेच संगमनेर तालुक्यात त्या कालावधीत कोणताही वाळूचा लिलाव झालेला नसतानाही वापरलेली वाळू पूर्णपणे अवैध, वाळू तस्करांकडून अथवा विकासकाने स्वत: नदी पात्रातून विनापरवानगी घेऊन वापरलेली आहे तसेच बेकायदेशीरपणे उत्खनन करून दगड, मुरूम वापरलेले आहे अशी तक्रार २०१८ मध्ये अमोल खताळ पाटील यांनी तहसीलदार, संगमनेर यांच्याकडे केली होती तत्कालीन महसूलमंत्री यांच्या दबावापोटी तक्रार कडे दुर्लक्ष केले जात होते तसेच विकासक कातोरे स्थानिक
कॉंग्रेस पक्षाचे नेते व जिल्हा परिषद सदस्य असल्यामुळे त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी दिरंगाई केली जात होती तरी अमोल खताळ यांनी वेळोवेळी पाठपुरावा, स्मरणपत्र देऊन प्रकरण तडीस नेले.
माहिती अधिकार मध्ये मिळविलेल्या सर्व कागदपत्रा मध्ये बस स्थानक विकासक कातोरे यांनी गौण खनिजबाबत कुठलीच परवानगी घेतलेली नाही असे उत्तर तहसील कार्यालय कडून मिळालेले होते. विकासकाने तहसीलदार संगमनेर महसूल विभागाच्या तोंडी सूचनेनुसार आम्ही रॉयलटी भरली आहे असे मोघम लेखी पत्र दिले होते विकासक BOT कामाबाबत महसूल विभागाची दिशाभूल करून कुठलाही खाण पट्टा आरक्षित नसताना मोघम चलन ३० किवा ३१ मार्चला ३ चलन भरणा दाखवत दाखविला आहे तो पूर्णता गौण खनिज अधिनियम तरतुदीच्या विरोधी असून त्याबाबत कुठल्या खाण पट्ट्यातून याचा उल्लेख नाही. चलन बाबत परवानगी पत्र, वाहन क्रमांक, पंचनामा रॉयल्टी, कार्यालयाकडे मागणी केलेले पत्र, ठेकेदाराने आरक्षित केलेला खान पट्टा दगड,मुरूम,वाळू याबाबत गौण खनिज परवाना नोंदवही तपासली असता त्यामध्ये कोणताही परवाना दिलेचे आढळून आलेले नाही.
Tags :
11546
10