पाथर्डी- निवडणुकीच्या वादातून विरोधकावर सशस्त्र हल्ला
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
निवडणुकीच्या कारणावरून मिडसांगवी अंतर्गत येणार्या भवरवाडी येथील एकास चौघांनी तलवार, हॉकी स्टिकने जबर मारहाण करून गंभीर दुखापत केली आहे.
नामदेव ज्ञानदेव थोरात यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. ग्रामपंचायतमध्ये नामदेव यांचा भाऊ विष्णु ज्ञानदेव थोरात हा ग्रामपंचायत निवडणुकीत निवडणुकीस उभा होता.
तर विरुद्ध बाजुकडुन अनिल कचरु जाधव हा उभा होता. अनिल कचरु जाधव हा निवडणूक हारला व नामदेव यांचा भाऊ जिंकून उपसरपंच झाला. त्यावेळी जाधव याने नामदेव यांस शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली होती. दि.23 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मिडसांगवी बस स्टॅण्ड येथे नामदेव उभा असतांना अचानक चौघांनी तलवार, हॉकी स्टिकने जबर मारहाण करून गंभीर दुखापत केली. थोरात यांच्या फिर्यादीवरून सचिन बबन गायकवाड, अनिल कचरु जाधव, रणजित भिमा गायकवाड,भागवत बबन गायकवाड सर्व रा. मिडसांगवी. यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.