शेवगाव: शेवटच्या दिवसअखेर ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी 411 उमेदवारी अर्ज
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील 12 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अतिंम दिवशी सरपंचपदासाठी 69, तर सदस्य पदांसाठी 411 असे एकून 480 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत .
बारा ग्रामपंचायत निवडणुकांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत काल शुक्रवारी संपली.या अंतिम दिवसापर्यंत 12 गावाच्या सरपंचपदासाठी 69, तर सदस्यपदासाठी 411 असे एकूण 480 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, यात सर्वात जास्त दहिगाव-ने 66 व अमरापूर 60 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सरपंच पदासाठी खामगाव व सुलतानपूर खुर्द येथे प्रत्येकी फक्त 2 अर्ज, तर या पदास सर्वांत जादा अमरापूर 13 व रांजणी 10 अर्ज दाखल झाले आहेत.
सरपंच व सदस्यपदासाठी दाखल अर्जांची संख्या
दहिगाव सरपंच 5, सदस्य -61 एकूण 66, अमरापूर सरपंच 13, सदस्य – 47 एकून 60, जोहरापूर सरपंच 5 सदस्य- 43 एकूण 48, भायगाव सरपंच 5, सदस्य-26 एकूण 31, खामगाव सरपंच 2 सदस्य -19 एकूण 21,
रांजणी- सरपंच 10, सदस्य 29 एकूण 39, प्रभूवाडगाव सरपंच 5, सदस्य 24 एकूण 29, वाघोली सरपंच 4, सदस्य 31 एकूण 35, सुलतानपूर सरपंच 2, सदस्य 29 एकूण 31, आखेगाव सरपंच 7, सदस्य 39 एकूण 46, खानापूर सरपंच 7 सदस्य 29 एकूण 36.