महाराष्ट्र
17299
10
अहमदनगर जिल्ह्यात एकाच दिवसात तब्बल पाच जणांची आत्महत्या
By Admin
अहमदनगर जिल्ह्यात एकाच दिवसात तब्बल पाच जणांची आत्महत्या
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
जिल्ह्यात शिर्डी, मिरजगाव, पाथर्डी, लोणीसह नगर तालुक्यातील पोखर्डी अशा 5 वेगवेगळ्या ठिकाणी विविध वयोगटातील 5 इसमांनी आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि.3) एकाच दिवसात समोर आल्या आहेत.
याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युच्या नोंदी करण्यात आल्या असून पोलीस या आत्महत्यांमागील कारणांचा शोध घेत आहेत. आत्महत्येची पहिली घटना शिर्डी येथे उघडकीस आली. शिर्डी शहरातील गुरुस्थान बिल्डींग येथे राहणारे पंकज गजानन शहाणे (वय 31) यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली आहे. पंकज यांच्या पत्नी 29 एप्रिल रोजी माहेरी श्रीरामपूर येथे गेल्या होत्या. त्यावेळी पंकज हेही त्यांच्यासोबत गेले. त्यानंतर रात्री 11 च्या सुमारास ते शिर्डीकडे जाण्यासाठी निघाले होते. त्यानंतर 2 ते 3 दिवस त्यांचा काहीही संपर्क झाला नाही. त्यांच्या मोबाईलवर फोन केला असता तोही बंद लागत होता. त्यामुळे त्यांच्या पत्नीचा भाऊ शुभम वाघ हा बुधवारी (दि.3) दुपारी 1 च्या सुमारास शिर्डी येथे गेला असता त्याला घराला आतून कडी असल्याचे दिसून आले. त्याने दरवाजा तोडून घरात जावून पाहिले असता पंकज शहाणे यांनी घराच्या छताला बेडशीटच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येची दुसरी घटना कर्जत तालुक्यातील आनंदवाडी येथे घडली. या ठिकाणी पप्पू वसंत शेळके (वय 30) या युवकाने दि.27 एप्रिल रोजी राहत्या घरी रोगर नावाचे किटकनाशक प्राशन केले होते. त्याला उपचारासाठी करमाळा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मिरजगाव पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.3) दुपारी आकस्मात मृत्युची
मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
26 वर्षीय युवकाने घेतला झाडाला गळफास
जिल्ह्यात आत्महत्येची तिसरी घटना नगर शहराजवळ असलेल्या छत्रपती संभाजीनगर रोडवरील पोखर्डी गावच्या शिवारात घडली. या ठिकाणी प्रशांत संजय आल्हाट (वय 26, रा.पोखर्डी, ता.नगर) या युवकाने पोखर्डी शिवारातील आंब्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि.3) सायंकाळी घडली. प्रशांत याने गळफास घेतल्याचे समजताच त्याचा भाऊ प्रदीप आल्हाट याने त्याला खासगी वाहनाने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला उपचारापुर्वीच मयत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पोलीस आत्महत्येच्या कारणाचा शोध घेत आहेत.
आणखी एका 28 वर्षिय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.3) रात्री 8.45 पुर्वी पाथर्डी तालुक्यातील कौडगाव आठरे येथे घडली. सचिन सुभाष गायकवाड असे या मयत युवकाचे नाव आहे. त्याने गळफास घेतल्याचे समजल्यावर त्याच्या नातेवाईकांनी त्याला नगरच्या सिव्हील हॉस्पिटल येथे आणले. मात्र डॉक्टरांनी त्याला उपचारापुर्वीच मयत घोषित केले. याबाबत पाथर्डी पोलिस ठाण्यात
आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राहाता तालुक्यातील लोहगाव येथील 51 वर्षिय इसमाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार (दि.2) रात्री 10.33 च्या सुमारास घडली. बाळासाहेब मुरलीधर सुर्यवंशी (वय 51, रा.लोहगाव, ता.राहात) असे मयत इसमाचे नाव आहे. त्यांनी गळफास घेतल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी लोणी येथील पीएमपी हॉस्पिटल येथे दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Tags :
17299
10





