पाथर्डी- 30 गावांचे वीज कनेक्शन बंद केल्याने महावितरण कार्यालयाला ठोकले टाळे
By Admin
पाथर्डी तालुक्यातील 30 गावांचे शेतीचे वीज कनेक्शन बंद केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड प्रताप ढाकणे यांनी आक्रमक भूमिका घेऊन वीज वितरणचा निषेध व्यक्त करत कार्यालयाला टाळे ठोकले.
वीज वितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा केल्यानंतर कट केलेले वीज कनेक्शन पूर्ववत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी अॅड प्रताप ढाकणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, काँग्रेसचे तालुकध्यक्ष नासिर शेख, शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख भाऊसाहेब धस, बंडू पाटील बोरुडे, दिगंबर गाडे, चांद मणियार, वैभव दहिफळे, देवा पवार, सोमनाथ टेके, योगेश रासने, उद्धव दुसंग, किशोर डांगे, अतिश निऱ्हाळी, रोहित पुंड, अक्रम आतार आदी उपस्थित होते
हाता तोंडाशी आलेले शेतीतील पीक आणि त्यात वीज वितरणने शेतीपंपाचे वीज कनेक्शन तोडल्याने पिकाला पाणी द्यायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. राज्य सरकारचे कुठलेही आदेश नसताना वीज वितरण कंपनीने मनमानी कारभार करत सुमारे तीसहून अधिक गावांतील शेती पंपाची वीज बंद केली. याचा निषेध म्हणून शनिवारी दुपारी ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी पाथर्डी येथील वीज वितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकले. गावात सिंगल फेज तसेच शेतीची वीज नाही पिण्याचे पाणी आठ दिवस झाले विहिरीतून शेंदून घ्याव लागत आहे. ग्रामीण भागात वीज नसल्याने दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होत आहे. वीज वितरणचे कर्मचारी जळालेले वीज रोहीत्र बसवण्याचे पैसे घेतात. गावातील वायरमन हा राजकारण करून काही भागातील वीज रोहित्र चालू ठेवतो आणि काही परिसरातील बंद ठेवतो हा जाणून-बुजून खोडसळपणाचा प्रकार सुरू आहे. असा आरोप शेतकऱ्यांनी आंदोलना दरम्यान केला.
राज्य सरकार विधिमंडळात जाहीरपणे सांगते की कोणत्याही शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट केले जाणार नाही. असे असताना वीज वितरण कंपनीला राज्य सरकारचे लेखी आदेश नसताना सुद्धा शेतकऱ्यांचे शेतीपंपाचे वीज कनेक्शन कट केले. वीज वितरणच्या कारभारावर परिणाम होऊ नये म्हणून वेळोवेळी राज्य शासन पैसे दिले जातंय, आज शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही. सध्या शेती मधील पिकाला साठ टक्के पाणी भरणे झाले असून उर्वरित भरणे बाकी आहे. वीज कट केल्याने पीक कसे हाती येईल आणि तो शेतकरी अजून आर्थिक संकटात सापडेल. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला आधार देऊन थकीत वीज बिल भरण्यासाठी एक महिन्याचा अवधी द्यावा त्यानंतर टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांचे वीज बिल भरून घ्यावेत अशी भूमिका ढाकणे यांनी घेतली.कट करण्यात आलेले वीज कनेक्शन संदर्भात बैठक होऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांची फोनवरून ढाकणेंनी चर्चा केली व तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेतीपंपाचे वीज कनेक्शन कट करू नये, उन्हाळा सुरू झाल्या आहे. शेतकरी पिकाला पाणी देण्याचे काम करतोय, त्यात वीज कट
केली तर शेतकऱ्यांचे पीक हातातून जाईल अशी विनंती ढाकणे यांनी अधिकाऱ्यांशी केली त्यानंतर अधिकाऱ्यांनीही ढाकणे यांची तालुक्यातील वस्तुस्थिती जाणून घेत तोडलेले वीज कनेक्शन पूर्वत करण्याचे आश्वासन वीज वितरणचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहे. पाथर्डी विज वितरणचे सहाय्यक अभियंता सुनील आहिरे हे आंदोलकांना सामोरे गेले. पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर, गुप्तवार्ताचे भगवान सानप, राम सोनवणे यावेळी उपस्थित होते.
9311
10





